गुरूवार, जुलै 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“बऱ्याच मागण्या असतात राव पोरींच्या…”, हेमंत ढोमेच्या पोस्टवर बायकोने दिलं उत्तर, क्षितीच्या कमेंटने वेधलं लक्ष, म्हणाली, “हट्ट पुरवायचे…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 12, 2024 | 10:14 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
kshitee jog on hemant dhome post

"बऱ्याच मागण्या असतात राव पोरींच्या…", हेमंत ढोमेच्या पोस्टवर बायकोने दिलं उत्तर, क्षितीच्या कमेंटने वेधलं लक्ष, म्हणाली, "हट्ट पुरवायचे…"

मराठी सिनेसृष्टीतील कलाकार जोड्या या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेल्या पाहायला मिळतात. अशीच एक मराठी सिनेविश्वातील कायमच सक्रिय असलेली आणि लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि अभिनेत्री क्षिती जोग. हेमंत व क्षिती ही जोडी नेहमीच सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा २’ या चित्रपटाच्या भरघोस यशामुळे ही जोडी विशेष चर्चेत आली. (kshitee jog on hemant dhome post)

‘झिम्मा २’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी हेमंतने उत्तमरीत्या पेलवली. तर क्षितीने या चित्रपटात निर्माती व अभिनेत्री अशा बाजू सांभाळल्या. हेमंत व क्षिती हे सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही पोस्ट करत चर्चेत असतात. हेमंतचा विनोदी जॉनर हा विशेष खास असल्याने तो नेहमीच काहीतरी विनोदी अशा पोस्ट करत असतो. अशातच हेमंतने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. यावेळी हेमंतने पोस्टसह दिलेल्या गमतीशीर कॅप्शनला गमतीशीर भाषेतच क्षितीने उत्तर दिलेलं पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – आजचे राशी भविष्य : आज सौभाग्य योगाचा शुभ संयोग, ‘या’ पाच राशींसाठी आजचा दिवस ठरणार फलदायी, जाणून घ्या…

View this post on Instagram

A post shared by Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21)

क्षितीच्या या गमतीशीर कमेंटने ‘पाटलीन बाई रॉक्स’ म्हणत तिच्या चाहत्यांनी तिचं भरभरुन कौतुक केलेलं पाहायला मिळत आहे. हेमंतने सायली संजीवने काढलेला एक फोटो पोस्ट करत, “नाही नाही म्हणत बऱ्याच मागण्या असतात राव पोरींच्या. आपण कसं दिलवाला व्हायचं, बाकी होतंय की मग आपोआप”, असं गावरान भाषेत कॅप्शन दिलं आहे. हेमंतच्या या पोस्टवर क्षितीने केलेल्या कमेंटने सर्वांना हसू आवरलं नाही. क्षितीने यावर कमेंट करत, “आता भावाकडून मागण्या नाही करणार पोरी तर कोणाकडून करणार. दादा म्हणून हट्ट पुरवायचे बहिणीचे”, असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – सुपरहिट मालिका केल्यानंतरही काम नाही, नोकरी केली अन्…; पडत्या काळाबाबत सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, “‘इंद्रधनुष्य’ मालिका…”

हेमंत व क्षिती यांनी नाटक, चित्रपट यांसारख्या माध्यमांमध्ये आपली छाप पाडली आहे. हेमंतने आजवर अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांच्या दिग्दर्शनाची धुरा पेलवली आहे. तर क्षितीने मराठी सिनेसृष्टीत आपलं स्थान निर्माण केल्यानंतर हिंदी सिनेसृष्टीतही स्वतःचा दबदबा निर्माण केला.

Tags: hemant dhome postkshitee jogkshitee jog on hemant dhome postmarathi celebrity couple
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
kaylee hottle died
Entertainment

‘गॉडजिला वर्सेस कॉन्ग’ फेम अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू, वडिलांप्रमाणे लेकीलाही ऐकू येत नव्हतं आणि…

जुलै 22, 2026 | 11:00 am
Next Post
Rohini Hattangady Surprise Birthday Gift

रोहिणी हट्टंगडींना विमानप्रवासादरम्यान मिळाल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, खास सरप्राइज मिळताच हात जोडून नमस्कार केला अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.