शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“दोन रुपये नाहीत हिच्याकडे आणि…”, भरगर्दीत सायरा बानूंना भलतंच बोलून गेले होते भरत जाधव, म्हणाले, “ही कसली नटी…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 9, 2023 | 1:01 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bharat Jadhav Shared Incident

"दोन रुपये नाहीत हिच्याकडे आणि…", भरगर्दीत सायरा बानूंना भलतंच बोलून गेले होते भरत जाधव, म्हणाले, "ही कसली नटी…"

‘सही रे सही’, ‘श्रीमंत दामोदर पंत’, ‘मोरूची मावशी’ या नाटकांमधून अभिनेता भरत जाधवने स्वतःची अशी ओळख निर्माण केली. आज यशस्वी अभिनेत्यांच्या यादीत भरत जाधव यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. मात्र भरत जाधव यांचा या अभिनय क्षेत्रातील प्रवास काही सोप्पा नव्हता. आजवर त्यांनी अनेक चित्रपट, मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अगदी अभिनय क्षेत्रात कुणीही वारसा नसताना भरत यांनी त्यांची सिनेसृष्टीतील स्वतःची अशी जागा स्वतः निर्माण केली. भरत जाधव यांचा स्वतःचा असा खूप मोठा चाहतावर्ग आहे. विनोदी कलाकार म्हणून त्यांनी कायमच प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. (Bharat Jadhav Shared Incident)

कोणत्याही कलाकाराला दिग्गज कलाकारांची भेट ही अविस्मरणीय असते. भरत जाधव हे जेव्हा पहिल्यांदा सायरा बानू यांना भेटले होते त्यावेळी त्यांच्याबरोबर घडलेला एक किस्सा त्यांनी ‘एबीपी माझा’च्या ‘माझा कट्टा’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितला. अगदी पहिल्या भेटीत भरत जाधव यांनी थेट सायरा बानू यांची मस्करीचं केली होती. हा वयाने लहान असल्याने आणि त्यावेळी सिनेसृष्टीबरोबर काहीही संबंध नसताना झालेली ही भेट असल्याने भरत पटकन काय म्हणून गेले हे त्यांचं त्यांनाच कळलं नाही.

आणखी वाचा – Video : …अन् बघता बघता पडल्या ऐश्वर्या नारकर, तोल गेल्यानंतर अभिनेत्रीने काय केलं पाहा, चाहत्यांनीही तब्येतीची केली विचारपूस

हा किस्सा सांगत भरत जाधव म्हणाले, “आम्ही लहान असताना एकदा सायरा बानू यांची मस्करी केली होती. आम्हाला शाळेत दोन रुपयाचं तिकीट दिलं जायचं. २०, २० पैशांची अशी ती तिकीट असायची. आणि सांगितलं जायचं की तिकीट बाहेर विकून तुम्ही पैसे घेऊन या. आमच्या घरी तर कोणीच विकत घेणार नव्हतं. त्यादरम्यान घराजवळच एक शूटिंग चालू होतं आणि तिथे सायरा बानू बसल्या आहेत असं मला कळलं. मी ते तिकीट घेऊन त्यांच्याजवळ गेलो. तेव्हा मी ते तिकीट त्यांच्यापुढे केलं आणि त्या म्हणाल्या, ‘बेटा आता माझ्याकडे पैसे नाहीत’.”

आणखी वाचा – स्वानंदी टिकेकर व आशिष कुलकर्णीची लगीनघाई; सुकन्या मोने, सुबोध भावेच्या पत्नीने केलं पहिलं केळवण, सुंदर सजावट अन्…

“हे ऐकल्यावर त्या गर्दीत मी पटकन म्हणालो, “दोन रुपये नाहीत हिच्याकडे आणि कसली नटी”. लहान असल्याने बुद्धी नव्हती तेवढी की आपण नेमकं काय बोलून गेलो, आम्हाला इतकंच कळायचं की, तिकीट विकलं गेलं नाही तर शाळेत काय सांगायचं. एवढ्या मोठ्या नटीकडे पैसे आहेत पण शूटिंग सुरु आहे म्हणून तिच्याजवळ त्यावेळेला पैसे नाहीत, याचा मी विचारचं नाही केला.”

Tags: bharat jadhaventertainmentmarathi actor
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
Next Post
Eknath Shinde sent Diwali gift to Marathi actors

मराठी कलाकारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून खास गिफ्ट, शेअर केले फोटो, भेटवस्तूमध्ये नेमकं काय आहे?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.