‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसत आहेत. मालिका सध्या लोकप्रियेच्या शिखरावर असून मालिकेत एकामागोमाग एक टर्निंग पॉईंट येताना दिसत आहेत. मालिकेत आलेल्या रंजक वळणांमुळे ही मालिका पाहणं प्रेक्षकांना रंजक ठरतंय. मालिकेच्या कथानकावर तसेच मालिकेतील कलाकारांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. अशातच मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत असलेल्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांचं सर्वत्र कौतुक केलं जातं आहे. (Aishwarya Narkar Video)
वयाची ४०शी ओलांडलेल्या ऐश्वर्या नारकर यांची ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरली आहे. या मालिकेतील एक सीन शूट करतानाचा व्हिडीओ ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. कलाकार मंडळी केवळ प्रेक्षकांचं मनोरंजन व्हावं या उदात्त हेतूने ते कसलीही जीवाची पर्वा न करता चित्रीकरण करतात. ही कलाकार मंडळी पडद्यावर उत्तम चित्र रेखाटावं म्हणून तसेच चाहत्यांचा हिरमोड होऊ नये म्हणून अहोरात्र मेहनत घेत असतात. ऊन, वारा, पाऊस याची कसलीच पर्वा न करता ते चित्रीकरण करतात.
अशातच ऐश्वर्या यांनी शेअर केलेल्या एका चित्रीकरणाच्या व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या bts व्हिडिओमध्ये ऐश्वर्या कठड्यावरून चालताना दिसत आहेत, आणि चालता चालता त्या मध्येच पाय अडखळून खाली पडतात. त्यांच्या हा सीन शूट करतानाचा bts पाहून प्रेक्षकांनी त्यांच्या अभिनयाचं कौतुक करत कमेंट केल्या आहेत. आज ऐश्वर्या या मालिकेत खलनायिकेची भूमिका जरी साकारत असल्या तरी त्यांची भूमिका ही प्रेक्षकांना विशेष आवडते.
ऐश्वर्या यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. यातील एका कमेंटने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एका चाहत्याने कमेंट करत म्हटलं आहे की, “नुकत्याच झालेल्या झी मराठी अवॉर्ड्समध्ये इतक्या शानदार मालिकेसाठी कोणतेही पुरस्कार कसे मिळाले नाहीत याचं मला आश्चर्य वाटतंय.” यावर ऐश्वर्या यांनी कमेंट करत म्हटलं आहे की, “ठीक आहे.”