सिनेसृष्टीतील लाडकी जोडी म्हणून अभिनेते अविनाश नारकर व अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांच्यावर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. आजवर सिनेसृष्टीत या मराठमोळ्या जोडीने प्रेक्षकांच्या मनात घर केलंच आहे. याशिवाय ही जोडी ओळखली जाते ती म्हणजे ट्रेंडिंग रिल्समुळे. वेगवेगळे व हटके रिल्स करत ही जोडी कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. त्यांचे ट्रेंडिंग गाण्यावरचे रिल्स सोशल मीडियावर वायरल होताना पाहायला मिळतात. आजही त्यांचा तो उत्साह काळानुसार पुढे जाण्याची वृत्ती प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडते. (Avinash Narkar On Jhimma 2)
अशातच अविनाश नारकर यांच्या एका रिलने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अविनाश नारकर यांनी ‘झिम्मा २’ चित्रपटातील ‘मराठी पोरी दुनियेला दाखविती माज’ या गाण्यावर ठेका धरलेला पाहायला मिळतोय. सध्या सर्वत्र हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळतेय. ‘झिम्मा २’ चित्रपटाच्या टीझर, ट्रेलरने चित्रपटाची उत्सुकता वाढवून ठेवली आहे. इतकंच नव्हे तर या चित्रपटातील ‘मराठी पोरी…’ या गाण्याने तर सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या गाण्यावर थिरकण्याचा मोह अविनाश नारकरांनाही आवरला नाही. नेहमीच ते ट्रेंडिंग गाण्यावर रिल्स करून चर्चेत असतात.
अविनाश नारकर यांनी ‘मराठी पोरी…’ गाण्यावर केलेल्या डान्सचा व्हिडीओ त्यांनी त्यांच्या ‘कन्यादान’ या मालिकेच्या सेटवरून शेअर केला आहे. अविनाश यांच्यासह या गाण्यावर ‘कन्यादान’ फेम अनिशा सबनीस व स्मिता हळदणकरही थिरकलेल्या पाहायला मिळत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला असून या व्हिडिओवर चाहत्यांसह कलाकार मंडळींनीही कमेंट करत त्यांच्या डान्सचं कौतुक केलं आहे.
अविनाश यांच्या या व्हिडिओवर ‘झिम्मा २’ चित्रपटाचा दिग्दर्शक हेमंत ढोमे याने कमेंट करत म्हटलं आहे की, “सुपर डुपर गोड अवि दादा आणि त्यांच्या अँजल्स”. यावर अविनाश यांनी कमेंट करत म्हटलं आहे की, “खूप खूप मनापासून अभिनंदन. आभाळभर शुभेच्छा” असं म्हणत चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. तर अविनाश यांच्या या व्हिडिओवर त्यांच्या पत्नी ऐश्वर्या नारकरांनी कमेंट करत, ‘खूप गोड’ असं म्हटलं आहे.