महाराष्ट्राच्या मातीत कला आणि राजकारण याचं एक वेगळं समीकरण पाहायला मिळत आहे. पेशाने जरी राजकारणी तरी अभिनय क्षेत्रात सुद्दा अग्रेसर असणारे काही कलाकार दोन्ही गोष्टी अगदी लीलया पेलतात. यातलं एक नाव म्हणजे अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे. अमोल कोल्हे सध्या शिवपुत्र संभाजी या त्यांच्या महानाट्या मध्ये सर्वत्र व्यस्त आहेत. प्रेक्षकांचाही या नाट्याला भरभरून प्रतिसाद मिळतं आहे. तरीही या सर्वांमधून त्यांनी समाज प्रबोधनाचा त्यांचा वसा सोडला नाही.(Amol Kolhe Injured)

अमोल कोल्हे यांचं शिवपुत्र संभाजी हे महानाट्य सध्या कराड येथे सुरु आहे. मात्र यातून एक दुःखद बातमी प्रेक्षकांच्या समोर आली आहे. महानाट्यातील एका घटने दरम्यान अमोल कोल्हे यांना पाठीची गंभीर दुखापत उद्भवली असल्यामुळे यापुढील कराड येथील सर्व उर्वरित प्रयोग रद्द करण्यात आले आहेत. या संदर्भात माहिती अमोल कोल्हे यांनी त्यांच्या सोशल मीडिया हॅन्डल्स वरून शेअर केली आहे.(Amol Kolhe Injured)
अमोल कोल्हे यांनी सांगितलं कि प्रयोग दरम्यान घोडेस्वारी करताना घोड्याच्या पायाच्या झटकेमुळे पाठीच्या मणक्यात त्रास होण्यास सुरुवात झाली. पण तरीही त्यांनी उर्वरित प्रयोग पूर्ण करून यासंदर्भात प्रेक्षकांना माहिती दिली. तर अमोल कोल्हे यांच्या या पोस्ट वर प्रेक्षकांनी ही कमेंट्स करत त्यांना लवकर ठीक होण्यासाठी शुभेच्छा देत त्यांच्या या कामाचं कौतुक केलं आहे.
हे देखील वाचा- द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग आणि दादांच्या कपाळावर आदळली गदा रक्तबंबाळ कपाळाने शूट केला होता ‘तो’ सीन..
अमोल कोल्हेंच इतिहासाप्रति छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रति असणारी आस्था, प्रेम हे जग जाहीर आहे त्यांच्या अभिनयातून, लेखणीतून त्यांनी वारंवार या गोष्टीची अनुभूती करून दिली आहे. तर काही महिन्यांपूर्वी त्यांच्या शिवप्रताप गरुडझेप या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावल. तर याच चित्रपटाचा पुढचा भाग शिवप्रताप स्वारी आग्रा हा देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आयेणार आहे याबाबतची माहिती त्यांनी दिली.