Akshay Kelkar Wedding : सध्या सर्वत्र लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. अशातच एकामागोमाग एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. नुकतीच ‘बिग बॉस’ फेम सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकरच्या शाही थाटामाटात पार पडलेल्या लग्नाची चर्चा सुरु आहे. तर दिव्या पुगांवकर, शिवानी सोनार आणि अंबर गणपुळे, रेश्मा शिंदे ही कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकली. कलाकारांची वैयक्तिक आयुष्यात लगीनघाई सुरु असताना आता यांत भर घालत आणखी एक मराठमोळा अभिनेता विवाहबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. हा अभिनेता म्हणजे ‘बिग बॉस’ विजेता आणि मराठी अभिनेता अक्षय केळकर. अक्षय केळकर लवकरच बोहोल्यावर चढणार असल्याचं समोर आलं आहे.
सोशल मीडियावर थेट पोस्ट शेअर करत अक्षयने लग्न करणार असल्याचं म्हटलं. “मे २०२५ . आता ना फिरणे माघारी, वाजवा हो तुतारी, करा ही तयारी. तरीही मुलींनो, आय लव्ह यु. मी फक्त तुमचाच आहे”, असं कॅप्शन देत त्याने चाहत्यांसह ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. अक्षयच्या या आनंदाच्या बातमीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण आज वर अक्षयने साऱ्या तरुणाईला भुरळ घातली आहे. त्यामुळे हा तरुण वर्ग वा चाहते अक्षयच्या लग्नाच्या बातमीने अर्थात नाराज आहेत, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. तर २०२५च्या मे महिन्यात अक्षय लग्नगाठ बांधणार आहे.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री गरोदर, थाटामाटात पार पडलं डोहाळे जेवण, हिरव्या साडीमध्ये खुललं सौंदर्य
अक्षय त्याची गर्लफ्रेंड साधनाबरोबर लग्नगाठ बांधणार आहे. अक्षय व साधनाच्या लग्नाला १० वर्ष पूर्ण झाली आहेत. अक्षयने यापूर्वीही अनेकदा त्याच्या आयुष्यातील साधनाबद्दल सांगितलं होतं. मात्र ही साधना नक्की कोण याबद्दल त्याने कधी सांगितलं नव्हतं. २३ डिसेंबरला त्यांच्या नात्याला १० वर्ष पूर्ण होताच त्याने त्याच्या आयुष्यातील साधनाचा चेहरा चाहत्यांसमोर आणला.
आणखी वाचा – राजेशाही एन्ट्री, कोकणी संस्कृतीचं दर्शन ते अवाढव्य खर्च; असं झालं अंकिता वालावलकरचं लग्न, व्हिडीओ व्हायरल
अक्षयची होणारी बायको साधना गायिका, गीतकार आहे. अक्षय केळकर व समृद्धी केळकरच्या ‘नाखवा’, ‘मैतरा’ गाण्यांसाठी साधनाने काम केलं होतं. अक्षय केळकरने दोघांच्या नात्याबद्दल जाहीर खुलासा केला असून येत्या मे महिन्यात ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे.