Kajol and Ajay Devgn Post : बॉलिवूड सिनेसृष्टीतील अजय देवगण व काजोल हे लोकप्रिय कपलपैकी एक आहेत. आजवर अजय व काजोल बरेचदा एकत्र कार्यक्रमांमध्ये हजेरी लावताना दिसले. १९९५ साली प्रदर्शित झालेल्या हलचल या चित्रपटादरम्यान अजय व काजोल यांची भेट झाली. आणि यानंतर, दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि २४ फेब्रुवारी १९९९ रोजी त्यांचे लग्न झाले. येत्या २४ तारखेला दोघेही त्यांचा लग्नाचा २६ वा वाढदिवस साजरा करणार आहेत. अजय व काजोल बॉलिवूडच्या पॉवर जोडप्यांमध्ये मोजले जातात. दरम्यान, सोशल मीडियावर त्याच्या नात्यावर अनेक प्रश्न विचारले जात आहेत. आणि याचा इशाराही प्रेक्षकांना सोशल मीडियाद्वारे मिळाला आहे. नक्की हा वाद काय आहे याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.
व्हॅलेंटाईन डेचे औचित्य साधत १४ फेब्रुवारी रोजी अजय देवगनने काही जुने रोमँटिक फोटो शेअर केले. यासह अभिनेत्याने दिलेल्या कॅप्शनने साऱ्यांच्या नजरा वळविल्या. “फार पूर्वी कोणाबरोबर आपले हृदय शेअर करायचे ठरवले होते आणि आजपर्यंत त्यावर मी ठाम आहे”, असं लक्षवेधी कॅप्शन देत अजय देवगणने हे फोटो शेअर केले. ज्याची चर्चा सर्वत्र होताना पाहायला मिळत आहे.
अजय देवगनने व्हॅलेंटाईन डे स्पेशल ही पोस्ट काजोलला टॅगही केली आहे. पण दुसरीकडे, काजोलने उलटपक्षी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत आणि चर्चा रंगली आहे. काजोलने स्वतःचा फोटो शेअर करत , “स्वतःलाच हॅपी व्हॅलेंटाईन डे, मी तुझ्यावर प्रेम करते”, असं तिने म्हटलं आहे. व्हॅलेंटाईन डे वर काजोलच्या स्वत: च्या प्रेमावरील या पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. लोकांनी असा अंदाज लावण्यास सुरुवात केली की दोघांमध्ये काहीतरी बिनसले आहे. अजय आणि काजोल या वेगवेगळ्या पोस्टवर लोकांनी सोशल मीडियावर आपला प्रतिसाद दिला आहे, त्यापैकी बहुतेकांना त्यांच्या नात्याबद्दल विचारण्यात आले आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले, “अजयने काजोलला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या आणि काजोलने स्वतःला दिल्या”.
काही मीडिया रिपोर्ट्सचा असा दावा आहे की काही काळापासून या दोघांमध्ये तडजोड सुरु झाली आहे. तथापि, अजय आणि काजोल यांनी अद्याप यावर कोणतेही अधिकृत विधान केले नाही. आता फक्त सत्य काय आहे, ते अजय व काजोलच सांगू शकतात. कामाबद्दल बोलायचे झाले तर, अजय देवगन अखेर ‘आझाद’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक कपूर यांनी केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष काही करु शकला नाही.