बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री ममता कुलकर्णी सध्या खूप चर्चेत आहेत. २००२ साली ती ‘कभी हम कभी तुम’ या चित्रपटानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीला राम राम केला. त्यानंतर त्यांनी भारत सोडला आणि त्या केनियाला शिफ्ट झाल्या. आता त्या तब्बल २४ वर्षांनी भारतात परतल्या. मात्र सध्या त्या कोणत्याही चित्रपटामुळे किंवा अभिनयामुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. ममता प्रयागराज येथे आयोजित करण्यात आलेल्या महाकुंभ मेळ्यात सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. ममता यांनी संन्यास घेतल्याची दीक्षा घेतली. ममता यांनी प्रयागराज महाकुंभात संन्यासाची दीक्षा घेतली असून आता त्यांना किन्नर आखाड्यात महामंडलेश्वर ही पदवी देण्यात आली आहे. (mamta kulkarni sanyasi)
ममता यांनी आध्यात्मिक यात्रा व किन्नर आखाड्याची पदवी मिळाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, “मला महाशक्तींनी याची निवड करण्याचे आदेश दिले. गेले २३ वर्ष मी ध्यान करत आहे. माझी खूप परीक्षा घेतली गेली आणि प्रत्येक परिक्षेमध्ये मी पास झाले. तेव्हा जाऊन मला महामंडलेश्वर उपाधी मिळाली आहे.
त्यानंतर ममता यांना ‘श्री यमाई ममता नंद गिरी’ हे नाव दिले गेले. महामंडलेश्वर दशनामी संप्रदायातील हिंदु भिक्षूंसाठी एक विशेष उपाधी आहे. यातील प्रमुख व्यक्ती सनातन धर्माचा प्रसार करतात. किन्नर आखाड्याची स्थापना २०१५ साली करण्यात आली होती. ही तृतीयपंथी लोकांना अध्यात्मिक क्षेत्रात समाविष्ट करण्यासाठी समर्पित करण्यात येते. यावेळी लक्ष्मी नारायण मूर्ती यांनी ममता यांना महामंडलेश्वर म्हणून नियुक्त केल्याबद्दल भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या की, “किन्नर आखाडा ममता कुलकर्णी यांना महामंडलेश्वर ही उपाधी देण्यात आली आहे. त्यांचे नाव आता श्री यामाई ममता नंदगिरी ठेवण्यात आले आहे. गेल्या दीड वर्षांपासून त्या किन्नर आखाडा व माझ्या संपर्कात आहेत”.
पुढे त्या म्हणाल्या की, “जर त्यांची इच्छा असेल तर त्या कोणतेही आध्यात्मिक पात्र साकारु शकतात. आम्ही कोणलाही कला प्रदर्शन करण्यापासून रोखत नाही”. ममता यांनी १९९२ साली ‘तिरंगा’ या सुपरहिट चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. त्यांनी आजवर जवळपास ४० बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘आशिक आवारा’, ‘करण अर्जुन’, ‘वक्त हमारा’ है आणि ‘क्रांतिवीर’ यांसारख्या अनेक चित्रपटांतून तिने आपल्या चाहत्यांच्या मनावर राज्य केले. २००१ मध्ये रिलीज झालेला ‘छुपा रुस्तम’ हा त्यांचा शेवटचा हिट चित्रपट होता.