गुजरातला जाण्यासाठी महत्त्वाच्या मार्गांपैकी एक असलेला घोडबंदर रोड दुरुस्तीच्या कामानिमित्त बंद आहे. घोडबंदर रोडवरील गायमुख घाटातील ७०० मीटर लांबीच्या रस्त्याची दुरुस्ती केली जणार आहे. या रस्त्याचं डांबरीकरण करण्याचं काम २४ मे पासून सुरु असून या कामानिमित्त प्रचंड वाहतूक कोंडी होतं आहे. त्यामुळे ठाणेवरुन मुंबईला व गुजरातवरुन महाराष्ट्रात येणाऱ्या येणाऱ्या अनेकांना या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. सामान्य जनतेसह अनेक कलाकार मंडळींनादेखील या वाहतूक कोंडीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
कामानिमित्त अनेक नागरिक मुंबई-ठाणे असा प्रवास करत असतात. तसेच अनेक मराठी मालिकाविश्वातील अनेक कलाकारही ठाणे ते मुंबई असा प्रवास करत असतात. त्यामुळे अनेकजण ठाणे-घोडबंदर या मार्गाचा वापर करतात. मात्र या मार्गावरील वाहतूक कोंडीमुळे अनेकजण त्रस्त झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे मध्य रेल्वेच्या कामामुळे लोकल ट्रेन्सच्या त्रासाने नागरिक त्रस्त आहेत तर दुसरीकडे या ठाणे-घोडबंदर रोडवरील ट्रॅफिकमुळेही अनेकांना वाहतूक कोंडीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
आणखी वाचा – कुठे गायब झाली ‘तारक मेहता…’मधील अंजली भाभी?, आता फक्त देवभक्तीमध्ये आहे तल्लीन, नेमकं कसं जगत आहे आयुष्य?
अशातच अभिजीत खांडकेकरनेही या वाहतूक कोंडीच्या व्हिडीओ शेअर केला आहे. अभिजीतने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये वाहनांची प्रचंड मोठी रांग लागली असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच अभिनेत्याने उपरोधिकपणे “Ohh I love Ghodbandar” (घोडबंदर माझं तुझ्यावर प्रेम आहे) असं म्हटलं आहे. अभिजीतने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओद्वारे ठाणे-घोडबंदरमधील सध्याच्या वाहतूक कोंडीची भीषणता पाहायला मिळत आहे.
दरम्यान, काल (३१ मे) रोजी अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनाही या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला असून याबद्दलचा एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी सर्वांना गरज नसल्यास प्रवास न करण्याचे आवाहन केले होते. तर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री नम्रता संभेराव व चेतना भट यांनीही त्यांचा या ट्रॅफिकमधील एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये दोघी ट्रॅफिकने त्रस्त झाल्यामुळे विरंगुळा म्हणून मोबाईलवर टाइमपास करत असल्याचे पाहायला मिळाले.