शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“इथे माझा मृत्यू झालाच तर…”, घोडबंदर रोडवरील ट्रॅफिकला वैतागून सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, “बेशिस्त ट्रक चालक…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 24, 2024 | 1:15 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Marathi Actor Abhijeet Kelkar shared a angry post regarding traffic on Thane Ghodbunder Road.

अभिजीत केळकरने घोडबंदर रोडवरील ट्रॅफिक संदर्भात शेअर केली मार्मिक पोस्ट

ठाण्यातील घोडबंदर रोड हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरून रोज लाखोंच्या संख्येत वाहनांची वर्दळ असते. याच मार्गावरुन मुंबई, पालघरसह गुजरातमध्ये जाणाऱ्या गाड्यांची ये-जा सुरु असते. अत्यंत महत्वाच्या या रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी असते. यामुळे या मार्गावरुन येणाऱ्या-जाणाऱ्या अनेकांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. सामान्य जनतेसह मराठी मनोरंजन विश्वात काम करणाऱ्या कलाकरांनाही या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. याबद्दल अनेकदा अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अशातच अभिनेता अभिजीत केळकरनेही घोडबंदर रोडवरील ट्रॅफिक संदर्भात मार्मिक पोस्ट शेअर केली आहे. (Abhijeet Kelkar on Thane Ghodbunder Road Traffic)

अभिनेता अभिजित केळकरला ठाणे शहर आणि परिसरातील वाहतुक कोंडीचा सामना करावा लागला असून यात तो दीड तास अडकला. ठाण्यातील रहदारीचा अनुभव घेतल्यानंतर अभिनेत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट लिहीत आपली खदखद व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. याबद्दल अभिजीतने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे आणि या पोस्टमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “आज शूटिंगचा साडेआठचा कॉल टाईम होता. साडेसात वाजता घरुन गुगल मॅप बघून निघालेला मी गेल्या दीड तास घोडबंदर रोडवरच्या घाटाच्या ही बराच आधी असलेल्या शेल पेट्रोल पंपच्या इथे बंपर टू बंपर ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे. ट्रॅफिक कधी सुटणार? आणि शूटिंगला आपण कधी पोहोचू शकणार? हे माहीत नाही”.

आणखी वाचा – घरोघरी मातीच्या चुली! आलिया भट्टने स्वतःच्याच नणंदेला म्हटलं चुगलीखोर, सतत गॉसिप करते आणि…

यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “या गोंधळलेल्या परिस्थितीत, घाणेरड्या रस्त्यांमुळे आणि बेशिस्त ट्रक चालकांमुळे, एखादा ट्रक किंवा ट्रॉलर उलटून त्याच्याखाली माझा मृत्यू झालाच आणि माझ्या पश्चात त्या ठिकाणाला चुकून माकून माझं नाव द्यायचा विचार झालाच तर माझा उल्लेख, ‘अभिनेता’ अभिजीत केळकर असा न करता ‘चांद्र मोहीमवीर’ अभिजीत केळकर असा करावा ही विनंती”. अभिजीतच्या या पोस्टखाली नेटकऱ्यांनीही त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत आणि या प्रतिक्रियांमधुन त्यांनीदेखील या रस्त्याबद्दलची आपली व्यथा सांगितली आहे.

आणखी वाचा – क्रांती रेडकरच्या लेकी आजोबांना सांगतात दिवसभरात काय घडलं?, अभिनेत्रीने व्हिडीओद्वारे दाखवला त्यांच्यातील बॉण्ड, भावुक नातं

अभिजीतच्या या पोस्टखाली नेटकऱ्यांनी “मी रोज या रस्त्याने जाते, उशीर झाला की माझे पैसेही कट होतात, या रस्त्यासाठी अजून २ वर्षे लागतील”, “मुंबई-ठाण्यातील ट्रॅफिक फारच प्रमाणात वाढली आहे. अर्धा पाऊण तासाच्या प्रवासाला आत्ता दीड ते दोन तास लागत आहेतं” अशा प्रतिक्रियांमधुन नेटकऱ्यांनी अभिजीतला दिलासा देण्याचे काम केले आहे. दरम्यान, अभिजीतने नुकतीच सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत केदार म्हणून एन्ट्री केली आहे.  

Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Next Post
Marathi actress Mrunmayee Deshpande shared a special video from her home in Mahabaleshwar

Video : मृण्मयी देशपांडेची महाबळेश्वरमधील घरात सुरु आहे धमाल, करणार स्ट्रॉबेरीची शेती, दाखवला संपूर्ण परिसर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.