शुक्रवार, सप्टेंबर 11, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“एकटेपण मला खात होतं”, ५१ व्या वर्षी एकटेपणाला वैतागली सुप्रसिद्ध अभिनेत्री, लेकही बरोबर राहत नाही आणि…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 9, 2025 | 11:55 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shilpa Shirodkar loneliness

"एकटेपण मला खात होतं", ५१ व्या वर्षी एकटेपणाला वैतागली सुप्रसिद्ध अभिनेत्री, लेकही बरोबर राहत नाही आणि…

Shilpa Shirodkar loneliness : बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शिरोडकरने हिंदी सिनेविश्वात बरंच काम केलं. हिंदी ‘बिग बॉस’ मुळेही त्या मध्यंतरीच्या काळात चर्चेत आलेल्या पाहायला मिळाल्या. त्यांनी रमेश सिप्पी यांच्या ‘भ्रष्टाचार’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात मिथून चक्रवर्ती प्रमुख भूमिकेत होते. त्यानंतर मिथून चक्रवर्ती आणि शिल्पा शिरोडकर यांनी ‘खुदा गवाह’, ‘हम’, ‘आँखे’ अशा अनेक चित्रपटांत काम केले. अभिनेत्री लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच तिने प्रसिद्धीझोतापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. तिने अपरेश रणजीत यांच्याशी लग्न केले आणि त्या परदेशात स्थायिक झाल्या. परदेशात राहण्याच्या अनुभवाबाबत अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.

शिल्पा शिरोडकरने नुकतीच ‘डेलनाज इराणी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान परदेशात राहण्याचा अनुभव सांगताना शिल्पा म्हणाली की, “मला लोकांमध्ये राहायला आवडतं आणि जे करिअर मी निवडलेलं त्यामुळे मी नवनवीन लोकांना भेटायचे. मी खूप व्यग्र असायचे. त्यामुळे परदेशात राहताना मला खूप एकटेपणा जाणवायचा. आम्ही कधीच एका देशात नाही राहिलो. आम्ही खूप प्रवास केला त्यामुळे माझ्यासाठी हे खूप कठीण होतं. एकटेपण मला खात होतं”.

आणखी वाचा – कुणी तरी येणार येणार गं…; लोकप्रिय मराठी अभिनेता लवकरच होणार बाबा, प्रेग्नन्सी किट दाखवत दिली गुडन्यूज

View this post on Instagram

A post shared by Shilpa Shirodkar Ranjit (@shilpashirodkar73)

पुढे ती म्हणाली, “माझा नवरा त्याच्या कामामुळे खूप प्रवास करतो. माझी मुलगी शिक्षणासाठी परदेशात गेली आहे. त्यामुळे मी घरी एकटीच असते. मी तरुण असताना याबद्दल काही वाटायचं नाही. पण आता मला आजूबाजूला माणसं हवी असतात. मला माणसांनी भरलेलं ते वातावरण खूप आवडतं”. पुन्हा काम करण्याबद्दल शिल्पा म्हणाली की, “मी काम मिळवण्यासाठी कास्टिंग एजेंटला फोन करायचे आणि ते प्रतिसादही द्यायचे”.

आणखी वाचा – प्रिया मराठेसह फोटो, मृत्यूची खोटी बातमी आणि…; दिशाभूल करताच मराठी अभिनेत्याचा संताप, विशाखा सुभेदारचीही कमेंट

कामाबाबत अभिनेत्री म्हणाली, “कास्टिंग एजेंटला माहित आहे की मी काम शोधतेय”. यादरम्यानचा अनुभव सांगताना शिल्पा म्हणाली की, ‘एका गाजलेल्या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनसाठी तिला विचारण्यात आलं होतं. पण, त्यातील काही सीन्समुळे तिने नकार दिला. जेव्हा अभिनेत्रीनं नकार दिला, तेव्हा एजंटने आणखी एक भूमिका असल्याचं सांगितलं. पण नंतर पुढे काही झालं नाही”.

Tags: bollywood actressentertainmentShilpa Shirodkar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
Kajal Aggarwal accident rumor

"मी अगदी ठीक आहे", अपघाताने मृत्यू झाल्याच्या अफवा पसरवणाऱ्यांवर भडकली अभिनेत्री, म्हणाली, "खोट्या बातम्या…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.