Sunjay Kapur Last Rites : बॉलिवूड अभिनेत्री करिष्मा कपूरचे पूर्वाश्रमीचे पती व्यावसायिक संजय कपूर यांचे अंत्यसंस्कार गुरुवारी, १९ जून रोजी नवी दिल्ली येथे होईल कारण कायदेशीर अडचणींमुळे लंडनमधून त्यांचा मृतदेह परत आणण्यास उशीर झाला. अभिनेत्री करिश्मा कपूरच्या पूर्वाश्रमीच्या पतीचे १२ जून रोजी वयाच्या ५३ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी दिल्लीतील लोधी रोड स्मशानभूमी येथे संध्याकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार होणार असल्याचं दिलेल्या निवेदनात सांगितलं. दरम्यान, पूर्वाश्रमीच्या पतीच्या अंत्यसंस्काराला करिष्मा तिच्या दोन्ही मुलांसह दिल्लीला रवाना झाली आहे. तसेच करिष्माची बहीण करीना कपूर आणि सैफ अली खानही दिल्लीला रवाना झाला आहे.
अनेक वृत्तानुसार, पोलो सामन्यादरम्यान मधमाशी गिळंकृत केल्याने संजय कपूरला अचानक हृदयविकाराचा झटका आला. मृत्यूच्या वेळी तो लंडनमध्ये होता. त्याच्या अमेरिकन नागरिकत्वाशी संबंधित कायदेशीर औपचारिकतेमुळे त्याच्या अंत्यसंस्काराच्या कारवाईस उशीर झाला. त्यांचे पार्थिव भारतात परत आणण्यासाठी अतिरिक्त कागदपत्रे आणि अधिकृत विधान आवश्यक असल्याचे कौटुंबिक सूत्रांनी उघड केले.
२२ जून रोजी दिल्लीतील ताज पॅलेस हॉटेलमध्ये संध्याकाळी ४ ते ५ दरम्यान प्रार्थना बैठक देखील नियोजित आहे. एनडीटीव्ही अहवालानुसार बुधवारी संजय कपूरच्या कुटुंबीयांनी एक प्रेस नोट जारी केली आणि त्यांच्या अंत्यसंस्काराबद्दल माहिती दिली. हे सांगण्यात येत आहे की गुरुवारी संध्याकाळी ५ वाजता नवी दिल्लीच्या लोधी रोड स्मशानभूमी येथे त्यांचे अंत्यसंस्कार होणार आहेत.
आणखी वाचा – Video : वडिलांचं पार्थिव पाहताच ढसाढसा रडू लागली मन्नारा चोप्रा, मन हेलावून टाकणारा व्हिडीओ समोर
दरम्यान, सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या एका नोटमध्ये, २२ जून रोजी दुपारी ४ ते ५ दरम्यान दिल्लीतील ताज पॅलेस हॉटेलमध्ये प्रार्थना बैठक आयोजित केली जाईल. या नोटमध्ये त्याची आई राणी सुरिंदर कपूर, त्याची पत्नी प्रिया आणि मुले सफीरा, अजारियस यांच्या सह्या आहेत. या नोटमध्ये त्याची पूर्वाश्रमीची पत्नी करिश्मा आणि तिची मुले समायरा आणि किआनची नावे देखील आहेत. २००३ ते २०१६ या काळात करिष्मा व संजय एकत्र होते. करिष्मा व संजयला समायरा व कियान ही दोन मुले आहेत. करिष्माबरोबरच्या घटस्फोटानंतर संजयने प्रिया कपूरशी लग्न केले आणि त्यांना आणखी दोन मुले सफिरा आणि अझरियस झाली. त्यांच्या पश्चात आई राणी सुरिंदर कपूरही आहे.





