असं म्हणतात कितीही मोठा व्यक्ती असला, श्रीमंत व्यक्ती असला तरीही काही ना काही गोष्ट अशी असतेच जी त्याला आयुष्यभर सतावते. पण यातून ही मार्ग नियती दाखवतेच. आनंदाचा मार्ग वेगळा असला तरीही समाधान मात्र तेच असावं. एक नाव असं आहे ज्याच्या नशिबात न लिहिलेला आनंद एका वेगळ्या मार्गाने पूर्ण झाला आणि आयुष्य बदललं ते म्हणजे मराठी मनोरंजन विश्वातील मानानं घेतलं जाणार नाव म्हणजे प्रसाद ओक. अनेक चित्रपट दिगदर्शक म्हणून, अभिनेता म्हणून समृद्ध करणं, अनेक नाटकांनी रंगभूमी गतिशील ठेवणं एकंदरीतच काय प्रेक्षकांचं केवळ मनोरंजन मनोरंजन आणि मनोरंजन करणं हेतूने या प्रसाद ओक या नावाकडे संपूर्ण प्रेक्षक वर्गा कडून पाहिलं जात.(Prasad Oak struggle)
आज चंद्रमुखी, धर्मवीर या चित्रपटांसाठी अनेक पुरस्कार प्रसादला दिले जाताना पाहायला मिळतायत निश्चितच त्याच्या कामाचं हे त्याला मिळालेलं फळ आहे. पण एक गोष्ट प्रसादच्या आयुष्यात अशी होती ज्यामुळे त्याला काही गोष्टी करणं इच्छा असून जमल्या नाहीत पण कोणत्या न कोणत्या मार्गाने ते ही सुख काही अंशी त्याला प्राप्त झाल.

लवकरच परिनिर्वाण या प्रसादाचा मुख्य भूमिका असणारा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या निम्मित प्रसादाची पत्नी मंजिरी ओक ने इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं कि प्रसादला मुलं लहान असताना कधी त्यांचे लाड पुरवायला वेळचं मिळाला नाही. ४८ – ४८ तास कामात असल्याने घर, मुलं यांकडे लक्ष देणं त्यांना शक्य होत नसायचं शिवाय प्रसादाची आपल्याला मुलगी असावी अशी देखील खूप इच्छा होती. एका लेकीचा बाप असंन तिचे लाड करणं या सगळ्या गोष्टी प्रसादला हव्या होत्या असं मंजिरीने सांगितलं.
हे देखील वाचा – ‘मी आणि माझ्या बायकोने ग्लुकोज बिस्किटाच्या पुडयावर कित्येक दिवस काढले’ प्रसादच्या संघर्षाची कथा

ती आली आणि….
पुढे ती म्हणाली आमच्या आयुष्यात मुलगी नाही पण मस्करा आली आणि ती कमी सुद्दा भरून निघाली. प्रसाद घरात आला कि मस्करा त्याच्या अंगावर धावून जाणार नाही असं होत नाही. कुठे बाहेर शूटींग असलं कि प्रसाद सारखा व्हिडिओ कॉल करून विचारतो मस्कारा कुठे आहे?, मस्कारा काय करते? असे प्रश्न त्याचे सुरु असतो. मस्कराने प्रसादला कदाचित वडिलांच्या जागी मानलंय आणि ओक कुटुंब ही अगदी स्वतःच्या कुटुंबाच्या सदस्या प्रमाणे मस्काराला जपत.(Prasad Oak struggle)
फक्त माणूसच नाही तर मूक प्राणी सुद्धा एखाद्याच्या आयुष्यात कशी सकारात्मकता आणि आनंद आणू शकतात याचं आणखी एक उत्तम उदाहरण म्हणजे ओक कुटुंब.