प्रत्येकाचं आपल्या आई सोबत एक वेगळंच बॉण्डिंग असतं. आई एक अशी व्यक्ती असते की जिला तुम्ही कितीही त्रास दिला, तरी ती तुमचं सगळं वागणं सहन करते. असचं अभिनेत्री क्रांती रेडकरचं तिच्या आईशी स्पेशल बॉण्डिंग आहे, क्रांती तिच्या आईसोबतचे गंमतीशीर व्हिडीओ नेहमी शेअर करत असते. क्रांतीने आता तिच्या आईचा एक किस्सा सांगणारा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडियोमध्ये स्वतः क्रांतीची आई नसून क्रांतीनेच आईची नक्कल केली आहे. चला तर पाहुयात हा व्हिडीओ. (Kranti Redkar Funny Video)
या व्हिडिओला क्रांतीने “Antifit clothes and my mom” असे कॅप्शन दिले आहे. क्रांतीच्या या व्हिडिओवर तिच्या चाहतीने “हो गं माझी आई तर बोलते, कोणी तरी दिलेत का तुला दुसऱ्यांनी घालायला” अशी कमेंट केली आहे. तसेच अभिनेत्री अक्षया नाईक हिने “Let’s exchange mothers when you wear झग्यासारखे dress and I wear fitted clothes ” अशी मजेशीर कमेंट केली आहे. तर अनेक जणांना “झगा” या शब्दावर हसू आवरत नाहीये.
हे देखील वाचा: ‘मुलं लहान असताना त्यांच्यासोबत वेळ घालवणं, लाड करणं कधी प्रसादला जमलंच नाही पण ….’ मंजिरीने सांगितली प्रसादाची ती भावुक बाजू….
क्रांती सोशल मीडियावर प्रचंड एक्टिव्ह असते, ती येत्या दिवसाला तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर गंमतीशीर व्हिडीओ शेअर करत असते. कधी आई कधी मुलं, कधी कोणता किस्सा सांगत तिच्या चाहत्यांना खळखळून हसवत असते. याचबरोबर क्रांतीची आई देखील क्रांतीच्या प्रत्येक प्रश्नाचे चांगलेच उत्तर देताना दिसते. त्यामुळे क्रांतीच्या चाहत्यांना तिची आणि आईची जुगलबंदी बघायला फार आवडते. (Kranti Redkar Funny Video)
हे देखील वाचा: अश्विनीने शेअर केली शाहीर साबळेंसोबतची खास आठवण
क्रांतीने सध्या अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला असून, ती सध्या दिग्दर्शन क्षेत्राकडे वळली आहे. क्रांतीचा लवकरच रेनबो नावाचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. क्रांतीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केल्यामुळे चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. चित्रपटातची प्रेक्षकांमध्ये या चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, उर्मिला कानेटकर, ऋषी सक्सेना आणि शरद केळकर हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.