कलाकार जेवढा अभिनयानं मोठा होत जातो त्याचा संघर्ष ही तेवढाच मजबूत असतो. कलाकाराच्या अभिनयात त्याने सोसलेल्या संघर्षाचा भाग जेव्हा जाणवतो तेव्हा त्याचा अभिनय अजून तीव्रपणे प्रेक्षकांच्या काळजाला भिडतो. मराठी, हिंदी कलाक्षेत्रात आज अग्रेसर असलेल्या कलाकारांचा संघर्ष ही तितकाच प्रेरणादायी असतो जितकी त्या कलाकाराची सिनेमातील एखादी भूमिका. महाराष्ट्राच्या सिनेसृष्टीत असाच एक कलाकार आहे ज्याची संघर्ष कथा प्रेक्षकांना भारावून टाकते. तो अभिनेता म्हणजे उत्तम अभिनय, परफेक्ट दिग्दर्शन अशी ख्याती असणारा प्रसाद ओक.(prasad manjiri struggle)
मागचं वर्ष २ गोष्टींमुळे प्रचंड चर्चेत राहील ते म्हणजे चंद्रमुखी चित्रपटाचं दिगदर्शन आणि धर्मवीर चित्रपटातील प्रसाद ने साकारलेल दिवंगत नेते आनंद दिघे यांचं पात्र. चंद्रमुखीच्या दिगदर्शनाच्या यशानंतर प्रसाद ओक त्याच्या अभिनयासाठी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरला. आयुष्यात इतकं कमवून ही पाय जमिनीवर असणाऱ्या कलाकारांच्या यादीत प्रसादच नाव घेतलं जात. कधी पडद्यावर तर कधी पडद्यामागे प्रसाद त्याच्या कामाने प्रेक्षकांना थक्क करून टाकतो. तर महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत परीक्षकांच्या भूमिकेत राहून एखाद्या कलाकृतीला निखळ दाद कशी द्यावी हे हि दाखवून देतो.
असे होते प्रसाद मंजिरीचे स्ट्रगल डेज (prasad manjiri struggle)
मंडळी प्रसादच्या संघर्षा मध्ये एक नाव कधी ही त्याच्या कथेपासून लांब राहत नाही ते नाव म्हणजे मिसेस मंजिरी ओक. प्रसाद ने बऱ्याच मुलाखतींमध्ये त्याच्या स्ट्रगलच्या काळात भक्कमपणे उभ्या राहिलेल्या माणसांच्या यादीत मंजिरीचं नाव सगळ्यात आधी घेतलं आहे. प्रसादच्या दिगदर्शनात, अभिनयात, सुख दुःखात या सर्वांमध्ये मंजिरी प्रेक्षकांना प्रसादच्या सोबत दिसली आहे. आजचा सुखी दिवस पाहण्यासाठी केले जाणारे कष्ट काय असतात ते प्रसाद ने इट्स मज्जाला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं.
====
हे देखील वाचा – “महाराष्ट्र मराठी माणसांचा पण मराठी सिनेमांचा नाही” मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत
====
प्रसादने मुलाखतीत सांगितलं कि एक काळ असा होता की जिथे मालिका वैगरे काही न्हवत. १९९७,९८ च्या काळात प्रसादचं ‘भ्रमाचा भोपळा’ नावाचं नाटक सुरु होत. राजा गोसावी सुद्धा त्या नाटकाचा भाग होते पण नाटक ऐन भरारीच्या वाटेवर असताना प्रयोगाच्या ४५ किंवा ४६व्या प्रयोगाला दुर्दैवाने राजा गोसावी यांनी जगाचा निरोप घेतला आणि नाटक चालायच बंद झालं. हाउसफुल्ल चालणार नाटक बंद झाल्यानंतर प्रसाद कडे ५ ते ६ महिने काहीच काम न्हवत. तेव्हा आम्ही दिवसभरात ग्लुकोज बिस्कीटचा एक पूड पाण्यात बुडवून खायचो. या काळात मंजिरी माझ्या सोबत होती आम्ही दोघांनी हा संघर्ष पाहिलाय.(prasad manjiri struggle)
आता असलेल्या दिवसांमध्ये सुद्दा आम्ही ते बिस्कीट पाण्यात बुडवून खातो कारण ती संघर्षाची चव राहावी, आठवन राहावी म्हणून असं देखील प्रसाद म्हणाला. आज प्रसादचा वाढदिवस आहे. प्रसाद ने ऐकवलेल्या या अनुभवांमधून खूप शिकण्यासारखं आहे.