महिलांना दागिन्यांची खूप आवड असते. आजवर अनेक दागिन्यांचे हजारो प्रकार बघायला मिळतात. गळ्यातील दागिने, कानातील दागिने, बांगड्या असे अनेकविध दागिने आपण बघतो. लग्न झालेल्या महिलेसाठी मंगळसूत्र हा एक महत्त्वाचा दागिना मानला जातो. काळे व सोन्याचे मणी असे असलेले मंगळसूत्र हे लग्न झालेल्या महिलेची शोभा वाढवतात. सुरुवातीला खूप कमी व्हारायटी असलेल्या मंगळसुत्रामध्ये आता अनेक प्रकार असलेले दिसून येतात. पण सगळ्यांना परवडतील आणि वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये सुंदर असे दागिने कुठे मिळतील त्याबद्दल आता आपण जाणून घेऊया. तसेच यासाठी कुठे जाता येईल याबद्दल माहिती घेऊया. (mangalsutra design)
सध्या सोन्याच्या मंगळसूत्राबरोबरच फॅन्सी मंगळसूत्र घालण्याचीदेखील फॅशन आहे. सध्या सर्वत्र लग्न सराईचे दिवस सुरू झाले आहे आणि आता प्रत्येक ठिकाणी एक वेगळा लुक आपण करावा असं प्रत्येक महिलेला वाटतं. असे मराठमोळे दागिने ठाण्यामध्ये तुम्हाला मिळू शकतील. या दुकानामध्ये अतिशय अतिशय पारंपारिक डिझाईनदेखील मिळू शकतात. तसेच त्याच सोबतच तिथे अनोखे हटके डिझाईन सुद्धा पाहायला मिळतात. विशेष म्हणजे याठिकाणी मंगळसूत्रांचा एक अनोखं आणि अफाट कलेक्शन देखील बघायला मिळते. चोकर मंगळसूत्र, राजमुद्रा मंगळसूत्र आणि विविध मंगळसूत्राच्या डिझाईन्स तुम्हाला बघायला मिळतील. त्याचप्रमाणे हे सगळं तुम्हाला कमी किंमतीमध्येदेखील मिळू शकते.
ठाण्यातील या दुकानात अनेक पॅटर्नदेखील बघायला मिळतील. सहावार, नऊवार, स्टायलीश अशा सर्व साड्यांवर अनेक प्रकारचे दागिने बघायला मिळतात. मंगळसूत्राबरोबरच या ठिकाणी वेगवेगळ्या बांगड्या, कानातले, विविध प्रकारच्या नथ, केसाच्या आंबाड्याला लावण्याचा सुंदर असा खोपा, कमरपट्टा, बाजूबंद, पेंडंट, नेकलेस यामध्येदेखिल अनेक व्हारायटीदेखील बघायला मिळतील.
हे सगळं घेण्यासाठी तुम्ही ईशा क्रिएशन, राम मारुती रोड, शिवा प्रसाद हॉटेल समोर, नवपाडा, ठाणे पश्चिम या पत्त्यावर तुम्हाला सुंदर आशा दागिन्यांची खरेदी करताना येणार आहे. लवकरच भेट देऊन मनासारखे दागिने खरेदी करा.