मालिका विश्वातील सध्याचा आवडता अभिनेता म्हणजे मंदार जाधव.सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेतून जयदीपच्या भूमिकेतून मंदार घराघरात पोहचला. त्याच्या अभिनय आणि लूक आवडणारे अनेक चाहते आहेत.मालिकेने तर मंदारला एक ओळख मिळालीच आहे.त्याच्या भूमिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. (Mandar Jadhav Struggle Story)
त्याचसोबत खऱ्या आयुष्यात मंदार कसा आहे, हे जाणून घ्यायला प्रेक्षकांना नेहमीच आवडत. स्क्रीन वरती जितकं सरळ, साधं सोपं आपल्याला दिसत ते तसंच असत असं नाही. मंदारचा अभिनेता होण्याचा प्रवास कसा सुरु झालं हे जाणून घेणार आहोत आजच्या जपलं ते आपलं या भागात, इट्स मज्जाला दिलेल्या एका मुलाखतीत मंदारला त्याच्या स्ट्रगल विषयी विचारण्यात आलं तेव्हा त्यानी त्याच्या करिअरची सुरुवात कशी झाली ते सांगितलं.
पाहा मंदारचा अभिनेता होण्याचा प्रवास कसा सुरु झाला (Mandar Jadhav Struggle Story)
मंदार म्हणाला, प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो माझ्या कडे देवाच्या दयेने घरची परिसथिती तशी चांगली होती. राहायला घर होतं, खायला अन्न होतं,पण काम नव्हतं.मी अपघातानेच अभिनय क्षेत्राकडे वळलो.मी माझा लहान भाऊ म्हणजे अभिनेता मेघन जाधव याच्यासोबत त्याच्या ऑडिशनसाठी गेलो होतो,तेव्हा तिकडे मलाच विचारण्यात आलं की तू ही भूमिका करशील का, या भूमिकेसाठी तू योग्य आहेस.(Mandar Jadhav Struggle Story)
त्यावर मंदार त्यांना म्हणाला मी अभिनेता नाहीय, त्यावर ते म्हणाले तू करून बघ, मंदारने लहानपणापासून त्याच्या वडिलांचा आणि मेघनचा अभिनय बघितला होता,ऑडिशन कशी देतात हे त्याला माहित होतं, आणि मंदारने ती ऑडिशन दिली आणि तेव्हा त्याला अल्लाहद्दीन नावाचा शो मिळाला.तिथून मंदारच्या अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात झाली.सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेपूर्वी मंदारने स्टार प्रवाह वरीलच गुरुदेव दत्त ही मालिका देखील केली होती. आणि आज मंदारचा अभिनेता म्हणून मोठा चाहता वर्ग आहे.
हे देखील वाचा : ‘म्हणून’ श्रुतीला मराठी सिनेसृष्टीमध्ये काम मिळणं झालं होत कठीण