शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“हे लोक एकत्र कसे झोपत असतील?”, अरमान मलिकला त्याच्या दोन लग्नांवरुन विचारला भलताच प्रश्न, उत्तर देत म्हणाला, “ज्याची इच्छा…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 2, 2024 | 12:47 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Ott 3

"हे लोक एकत्र कसे झोपत असतील?", अरमान मलिकला त्याच्या दोन लग्नांवरुन विचारला भलताच प्रश्न, उत्तर देत म्हणाला, "ज्याची इच्छा…"

Bigg Boss Ott 3 : ‘बिग बॉस ओटीटी सीझन ३’ ची आणि स्पर्धक युट्युबर अरमान मलिकची सध्या खूप चर्चा होत आहे. बहुपत्नीत्वामुळे त्यांच्यावर टीकाही होत आहे. या स्पर्धकाचे आजवर तीन वेळा लग्न झाले आहे. प्रथम, जेव्हा तो १७ वर्षांचा होता त्यावेळी त्याचे लग्न झाले. त्या लग्नाच्या घटस्फोटानंतर त्याने पायलशी दुसरे लग्न केले आणि नंतर त्याची जिवलग मैत्रीण कृतिकालाही आपली जीवनसाथी बनवले. तिघांच्या संदर्भात सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत. काहीजण त्यांचे समर्थन करत आहेत तर अनेकजण त्यांच्या नात्यावर टीका करत आहेत. दरम्यान, घरातील सदस्य मुनिषा खटवानी यांनी या तिघांच्या लग्नाचा खरपूस समाचार घेतला आहे. लव कटारिया व विशाल पांडे यांच्यासमोर ती म्हणाला की, “हे लोक कसे झोपत असतील?”.

‘बिग बॉस ओटीटी ३’ सुरु होऊन दोन आठवडे झाले आहेत. घरात रोज नवी नाती निर्माण होत आहेत आणि बिघडत आहेत. अरमानने आपल्या दोन्ही पत्नींसह शोमध्ये प्रवेश केला होता, परंतु त्यापैकी त्याची पहिली पत्नी पायल मलिकला बाहेर काढण्यात आले आहे. यानंतर आता मुनिषा खटवानी आपल्या बहुपत्नीत्वाबद्दल बोलताना दिसली. गेल्या एपिसोडमध्ये विशाल पांडे, लवकेश कटारिया व मुनिषा खटवानी अरमान त्याच्या दोन्ही बायकांबरोबर एकाच छताखाली राहत असल्याबद्दल चर्चा करताना दिसले. पायल स्वतः बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यामुळे कृतिकाला आता अरमानबरोबर घालवायला अधिक वेळ मिळत आहे. हे पाहून पायल मलिकला वाईट वाटेल का, असा प्रश्न विशालला पडला.

आणखी वाचा – सुश्मिता सेनला मरणाच्या दारातून परतत मिळाला नवा जन्म, नव्या जन्म तारखेविषयीही केला खुलासा, ‘त्या’ दिवशी नेमकं काय घडलं?

View this post on Instagram

A post shared by Payal Malik (@payal_malik_53)

याशिवाय मुनिषा विशाल व लवकेशला विचारताना दिसली की ते तिघेही (पायल, अरमान आणि कृतिका) एकत्र कसे झोपतात?, यावर लवकेश हसला आणि म्हणाला की त्याने अरमानला हेच विचारले होते आणि अरमानने त्याला सांगितले होते की, ज्याला कुठेही झोपायचे असेल तिथे तो झोपू शकतो. हे ऐकून विशाल व लव कटारिया दोघेही एकमेकांकडे बघून हसायला लागतात. नंतर मुनिषा म्हणते की, हे तिचे वैयक्तिक आयुष्य आहे. पायल व कृतिकामध्ये चांगले बॉन्ड असल्याचेही तिने सांगितले.

आणखी वाचा – “आमच्या बाबतीत हे घडलं असलं तरी…”, दोन लग्न करण्यावर अरमान मलिकच्या पहिल्या पत्नीचे भाष्य, म्हणाली, “चुकीचा निर्णय…”

अरमान, कृतिका व पायलचा एक जुना मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अरमान सांगतो की, “पूर्वी तिघेही एकत्र झोपायचे, पण त्यांना तीन मुले होती. त्यामुळे आता ज्याची इच्छा असेल तो येऊन त्याच्याबरोबर झोपतो”. पायलनेही याला सहमती दर्शवली.

Tags: arman malikarman malik wifebigg bossBigg Boss OTT 3entertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Hina Khan Emotional Video

हिना खानला स्तनाचा कर्करोग, पहिला केमोआधी पुरस्कार सोहळ्याला पोहोचली अभिनेत्री, व्हिडीओ समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.