‘मन धागा धागा जोडते नवा’ ही मालिका सुरु झाल्यापासून या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. सध्या या मालिकेत खूप मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळत आहे. मालिकेने अचानक सहा वर्षांचा लीप घेतलेला पाहायला मिळत आहे. दरम्यान, आनंदी व सार्थकची ताटातूट झालेली पाहायला मिळत आहे. अशातच आनंदी मालिकेत दिसत नसल्याने प्रेक्षक आनंदीला मिस करताना दिसत आहेत. मालिकेत आनंदी ही व्यक्तिरेखा अभिनेत्री दिव्या पुगांवकर साकारत आहे. (Divya Pugaonkar Relation)
‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेमुळे दिव्याला लोकप्रियता मिळत असली तरी ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमुळे ती घराघरांत पोहोचली. अभिनयाबरोबर सोशल मीडियावरही दिव्या बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच दिव्याने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन तिच्या नात्याची जाहीर कबुली दिली आहे. दिव्याने तिच्या रिलेशनशिपला चार वर्ष पूर्ण झाली असल्याचं सांगितलं आहे.
“चौथ्या अनिव्हर्सरीच्या शुभेच्छा माय लव्ह. या सर्व खास आठवणी तुझ्याबरोबर शेअर करायला मिळत आहेत म्हणून खूप आभारी आहे”, असं कॅप्शन देत दिव्याने रोमँटिक असा व्हिडीओ शेअर केला आहे. तर दिव्याचा होणारा पती अक्षरने “आयुष्यात तुम्ही कुठे जाता ते नाही, तर तुम्ही कोणासह प्रवास करता. चार वर्षे, ४८ महिने, २०८ आठवडे ६ दिवस आणि सर्व मिळून १४६२ दिवस. आपण कितीही मोजले तरी ते प्रेम वाढवते. धन्यवाद दिव्या. माझ्या आयुष्यात सर्व सुख आणल्याबद्दल. मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो आणि हे दिवसेंदिवस मजबूत होत जाईल”, असं कॅप्शन देत नात्याची जाहीर कबुली दिली आहे.
दिव्याच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव अक्षर घरत आहे. अक्षर एक फिटनेस मॉडेल आहे. न्यूट्रिशनिस्ट, प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर म्हणूनही त्याची ओळख आहे. दिव्या व अक्षयची मैत्री फेसबुकवर झाली होती. त्यानंतर काही काळाने दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.