शुक्रवार, एप्रिल 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

जय दुधाणेच्या वडिलांचे निधन, कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर, म्हणाला, “माझा सुपरहिरो गमावला”

Saurabh Moreby Saurabh More
जून 26, 2024 | 9:26 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi fame Jay Dudhan's father passed away and the actor Share the sad post on social media

जय दुधाणेच्या वडिलांचे निधन, कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर, म्हणाला, "माझा सुपरहिरो गमावला"

वडील हा प्रत्येक मुलाच्या आयुष्यातला सुपरहिरो असतो. त्या सुपरहिरोच अस्तित्व हे प्रत्येक मुलासाठी महत्त्वाचं असतं. पण ते अस्तित्वचं अचानक नाहीसं झालं तर कोणताही माणूस कोलमडून पडतो. असंच काहीसं झालं एका मराठी अभिनेत्याबद्दल आणि हा अभिनेता म्हणजे ‘बिग बॉस मराठी’ फेम जय दुधाणे. जय दुधाणेला नुकताच पितृशोक झाला आहे आणि याबद्दल स्वतः जयने सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे. जयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे वडिलांबद्दलची भावुक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्याने त्याच्या आयुष्यातला सुपरहिरो गमावल्याची दुःखद भावनादेखील व्यक्त केली आहे.

या पोस्टमध्ये जयने त्याच्या भावना व्यक्त करत असं म्हटलं आहे की, “मी हे शेअर करेन असे कधी वाटले नव्हते. २४ जूनच्या मध्यरात्री कार्डियाक अरेस्टमुळे मी माझा सुपरहिरो गमावला. तो फक्त आमच्या कुटुंबासाठीच नाही तर त्याच्या ओळखीच्या प्रत्येकासाठी एक रत्न होता. ते नेहमी त्यांच्या प्रामाणिकपणा आणि आश्वासक वृत्तीसाठी ओळखले गेले. सामाजिक कार्य ही त्यांची आवड होती. नेहमी एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न केला”.

View this post on Instagram

A post shared by J A Y D U D H A N E (@jaydudhaneofficial)

आणखी वाचा – Video : आमिर खानचा मराठमोळा जावई व त्याची आई एअरपोर्टवरच खाऊ लागले भेळ व दाबेली, जपला साधेपणा, व्हिडीओ व्हायरल

यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “माझे सर्व मित्र ते ज्यांना काका म्हणायचे, त्यांचे सर्व मित्र जे त्यांना अनिलभाई म्हणायचे, तसेच त्यांना ओळखत असलेल्या सर्व लोकांसाठी, तुम्ही आता त्यांना शेवटचे पाहू शकता. ते आपल्या हृदयात, आपल्या मनात कायम राहतील. या पुढे २४ जून २०२४ हा माझ्या आयुष्यातील सर्वात काळा दिवस असेल. कारण मी फक्त माझे वडीलच नाही तर एक खरा मित्र, खरा पालक आणि एक खरा माणूस गमावला आहे”.

आणखी वाचा – मिथुन, वृषभ व कर्क राशीच्या लोकांसाठी बुधवार असणार फलदायी, नोकरीत व व्यवसायात होणार आर्थिक लाभ

यापुढे जयने “तुम्ही जिथे असाल तिथे देव तुमचे कल्याण करो. तुम्ही नेहमी आणि नेहमी माझ्या हृदयात राहशील. मी तुमच्यावर कायम प्रेम करत राहीन” असं म्हणत वडिलांबद्दलच्या शेवटच्या आठवणी व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, जय हा सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत तो खलनायक साकारत असून त्याची भूमिका प्रेक्षकांना आवडत आहे.

Tags: Jay Dudhane's father Passes AwayJay Dudhane's Father Passes Away News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Akshay Kelkar Father
Entertainment

अक्षय केळकरचे वडील आजही चालवतात रिक्षा, रिक्षाचालक आणि मराठी वादाबाबत म्हणाले, ” इथे कमवता आणि…”

एप्रिल 24, 2026 | 4:39 pm
kashmira kulkarni injured leg
Entertainment

पायाला दुखापत, शस्त्रक्रिया आणि…; ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम अभिनेत्री मालिकेतून घेणार ब्रेक?, मोठी अपडेट समोर

एप्रिल 24, 2026 | 1:55 pm
Sunita Ahuja viral video
Entertainment

गोविंदा आणि त्याच्या पत्नीमध्ये पुन्हा बिनसलं, समोर आलेल्या व्हिडीओने झालं स्पष्ट, Video व्हायरल

एप्रिल 24, 2026 | 12:55 pm
Gayatri Datar Wedding
Entertainment

मराठी अभिनेत्रीची लगीनघाई, ग्रहमखचे फोटो समोर, होणाऱ्या नवऱ्यानेही लग्नविधीचे फोटो केले शेअर

एप्रिल 24, 2026 | 11:51 am
Next Post
Saatvya Mulichi Saatvi Mulgi serial update Rupali use reflection power against Shekhar to get Astikatyar

अस्तिकट्यारसाठी रुपालीकडून शेखरविरुद्ध प्रतिबिंब शक्तीचा वापर, विरोचकाला कट्यार मिळणार का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.