शुक्रवार, सप्टेंबर 11, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आनंदीच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदाराला पाहिलंत का?, नात्याला चार वर्ष पूर्ण, या क्षेत्रात आहे कार्यरत

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 25, 2024 | 8:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Divya Pugaonkar Relation

आनंदीच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदाराला पाहिलंत का?, नात्याला चार वर्ष पूर्ण, या क्षेत्रात आहे कार्यरत

‘मन धागा धागा जोडते नवा’ ही मालिका सुरु झाल्यापासून या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. सध्या या मालिकेत खूप मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळत आहे. मालिकेने अचानक सहा वर्षांचा लीप घेतलेला पाहायला मिळत आहे. दरम्यान, आनंदी व सार्थकची ताटातूट झालेली पाहायला मिळत आहे. अशातच आनंदी मालिकेत दिसत नसल्याने प्रेक्षक आनंदीला मिस करताना दिसत आहेत. मालिकेत आनंदी ही व्यक्तिरेखा अभिनेत्री दिव्या पुगांवकर साकारत आहे. (Divya Pugaonkar Relation)

‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेमुळे दिव्याला लोकप्रियता मिळत असली तरी ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमुळे ती घराघरांत पोहोचली. अभिनयाबरोबर सोशल मीडियावरही दिव्या बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच दिव्याने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन तिच्या नात्याची जाहीर कबुली दिली आहे. दिव्याने तिच्या रिलेशनशिपला चार वर्ष पूर्ण झाली असल्याचं सांगितलं आहे.

आणखी वाचा – “जन्मोजन्मी साथ…”, अधिपतीसाठी अक्षराचा खास उखाणा, श्रीमंती सोडून साधेपणाने दोघंही जगत आहेत आयुष्य, किराणा मालाच्या दुकानात करत आहे काम

View this post on Instagram

A post shared by Divya Pugaonkar (@divyasubhashpugaonkar_official)

“चौथ्या अनिव्हर्सरीच्या शुभेच्छा माय लव्ह. या सर्व खास आठवणी तुझ्याबरोबर शेअर करायला मिळत आहेत म्हणून खूप आभारी आहे”, असं कॅप्शन देत दिव्याने रोमँटिक असा व्हिडीओ शेअर केला आहे. तर दिव्याचा होणारा पती अक्षरने “आयुष्यात तुम्ही कुठे जाता ते नाही, तर तुम्ही कोणासह प्रवास करता. चार वर्षे, ४८ महिने, २०८ आठवडे ६ दिवस आणि सर्व मिळून १४६२ दिवस. आपण कितीही मोजले तरी ते प्रेम वाढवते. धन्यवाद दिव्या. माझ्या आयुष्यात सर्व सुख आणल्याबद्दल. मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो आणि हे दिवसेंदिवस मजबूत होत जाईल”, असं कॅप्शन देत नात्याची जाहीर कबुली दिली आहे.

आणखी वाचा – ‘पुन्हा कर्तव्य आहे’मधील आकाशची बायको आहे हिंदी मालिकांमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री, दिसते इतकी सुंदर, अभिनेत्याने सांगितली लव्हस्टोरी

दिव्याच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव अक्षर घरत आहे. अक्षर एक फिटनेस मॉडेल आहे. न्यूट्रिशनिस्ट, प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर म्हणूनही त्याची ओळख आहे. दिव्या व अक्षयची मैत्री फेसबुकवर झाली होती. त्यानंतर काही काळाने दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

Tags: divya pugaonkardivya pugaonkar husbandDivya Pugaonkar Relationmarathi serial
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
Bigg Boss Marathi fame Jay Dudhan's father passed away and the actor Share the sad post on social media

जय दुधाणेच्या वडिलांचे निधन, कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर, म्हणाला, "माझा सुपरहिरो गमावला"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.