मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘पुन्हा कर्तव्य आहे’मधील आकाशची बायको आहे हिंदी मालिकांमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री, दिसते इतकी सुंदर, अभिनेत्याने सांगितली लव्हस्टोरी

Saurabh Moreby Saurabh More
जून 25, 2024 | 3:05 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Punha Kartavya Aahe fame Akshay Mhatre lovestory see the details

'पुन्हा कर्तव्य आहे'मधील आकाशची बायको आहे हिंदी मालिकांमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री, दिसते इतकी सुंदर, अभिनेत्याने सांगितली लव्हस्टोरी

झी मराठी वहिनीवर नव्यानेच सुरु झालेली मालिका ‘पुन्हा कर्तव्य आहे’ ही प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. १८ मार्चपासून ही मालिका झी मराठीवर प्रसारित होत असून मालिकेला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. ‘पुन्हा कर्तव्य आहे’मध्ये अभिनेता अक्षय म्हात्रे आणि अभिनेत्री अक्षया हिंदळकर प्रमुख भूमिकेत आहेत. मात्र तुम्हाला माहीत आहे का अक्षयचे खऱ्या आयुष्यात लग्न झाले असून त्याची पत्नी ही हिंदी मालिकाविश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. अभिनेत्री श्रेणू पारीख ही अक्षयची पत्नी असून त्यांनी गेल्यावर्षीच त्यांनी लग्नगाठ बांधली.

२१ डिसेबंर २०२३ रोजी हा लग्नसोहळा पार पडला होता. नुकतंच अभिनेत्याने झी मराठीच्या ‘होम मिनिस्टर’च्या एका खास भागात त्याच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितलं आहे. ‘घर एक मंदिर’ या मालिकेत काम करताना २०२१ साली अक्षय व श्रेणू यांच्यात मैत्री झाली आणि पुढे त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. कोरोना काळात शूटिंग करत असताना त्यांच्यात प्रेम झालं. त्यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष आवडली होती. या मालिकेच्या सेटवर प्रेमात पडल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – बाप म्हणून कमी पडल्याची अर्जुनला जाणीव, अमोलला एकट्यालाच सोडल्यामुळे कोसळलं रडू, अप्पी विचारणार जाब

अक्षय-श्रेणू दोघांनीही सोशल मीडियावर त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील फोटो शेअर केले आहेत. शिवाय त्यांच्या लग्नसोहळ्यात टीव्ही विश्वातील अनेक कलाकार उपस्थित होते, या सोहळ्याचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेत. अक्षय आणि श्रेणू दोघांनीही सोशल मीडियावर त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील फोटो शेअर केले आहेत. शिवाय त्यांच्या लग्नसोहळ्यात टीव्ही विश्वातील अनेक कलाकार उपस्थित होते, या सोहळ्याचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांच्या फोटो व व्हिडीओला चाहत्यांकडूनही तुफान प्रतिसाद मिळतो.

आणखी वाचा – ‘बिग बॉस ओटीटी ३’मधून पहिल्याच आठवड्यात एक स्पर्धक घराबाहेर पडणार, कोणाची एक्झिट होणार?

दरम्यान, लोकांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, अक्षयने याआधी ‘पिया अलबेला’, ‘ये दिल मांगे मोअर’ अशा विविध हिंदी मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. तर त्याच्या पत्नीने ‘इश्कबाज’, ‘इस प्यार को क्या नाम दूँ २’, ‘मैत्री’, ‘दिल बोले ओबेरॉय’, ‘घर एक मंदिर’, ‘ब्याह हमारी बहू का’ अशा अनेक मालिकांमध्ये मुख्य नायिका साकारली आहे. श्रेणूने आजवर अनेक आघाडींच्या मालिकांमध्ये मुख्य नायिकेची भूमिका साकारली असून अनेकदा टीआरपीच्या शर्यतीतही ती अव्वल ठरली आहे.  

Tags: akshay mhatremarathi entertainment newsshrenu parikh
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
Akshara Special Ukhana

"जन्मोजन्मी साथ…", अधिपतीसाठी अक्षराचा खास उखाणा, श्रीमंती सोडून साधेपणाने दोघंही जगत आहेत आयुष्य, किराणा मालाच्या दुकानात करत आहे काम

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.