मल्याळम मनोरंजन क्षेत्रातून सध्या खूप काही ऐकायला मिळत आहे. मल्याळम अभिनेता व निर्माता बाबूराजवर एका ज्युनिअर आर्टिस्टने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. त्या प्रकरणानंतर मनोरंजन सृष्टीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आरोप केलेल्या माहिलेचा आरोप आहे की अभिनेत्याने अलुवा येथील घरी चित्रपटातील एका भूमिकेच्या चर्चेसाठी बोलावलं होतं. जेव्हा ती घरी गेली तेव्हा तेथे बाबूराज व त्यांचा असिस्टंट उपस्थित होते. मात्र अभिनेत्याने सांगितले होते की यावेळी घरी दिग्दर्शक, लेखक व प्रॉडक्शन कंट्रोलरदेखीक उपस्थित असतील. मात्र असे काहीही नव्हते. (malyali actress sexual assault allegations)
अभिनेत्रीने या भयानक प्रसंगावर भाष्य करताना सांगितले की, “मला भूमिकेच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी घरी बोलावले. त्यावेळी तिथे फक्त त्याचा सहाय्यक होता. त्याठिकाणी मला एक खोली आराम करण्यासाठी दिली होती. नंतर अचानक मी ज्या खोलीत आराम करत होते त्या ठिकाणी अचानक बाबूराज आला. माझ्याशी बोलताना त्यांनी खूप चुकीची भाषा वापरली आणि माझ्यावर लैंगिक अत्याचार केले. तो खूप प्रसिद्ध अभिनेता असल्याने मला कोणाकडूनही पाठिंबा मिळाला नसता म्हणून मी या प्रकाराबद्दल कोणालाही काहीही सांगितलं नाही”.
नंतर अभिनेत्रीने सांगितले की, “चित्रपटसृष्टीमध्ये असे अनेक चुकीचे प्रकार होत असतात. एखादी भूमिका मिळवण्यासाठी माहिला कॉम्प्रोमाइज करण्यासाठी तयार आहे का? यासाठी विचारले जाते. मात्र भीतीमुळे बाबूराज यांच्याबद्दल कोणतीही तक्रार केली नाही. पीडित महिलांना कोणीही पाठिंबा देत नाही. मात्र कोच्चीतील डीसीपीबरोबर बोलले तेव्हा त्यांनी मला तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला. मात्र त्यावेळी कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नव्हती”.
आणखी वाचा – ‘बाप्पा आमचा आला’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, ‘आठवी अ’चे कलाकार कल्ला करणार
मात्र आता हे आरोप बाबूराजने फेटाळून लावले आहेत. असं काहीही झालं नसल्याचे स्पष्ट केले आहे. तक्रारदारांविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचेदेखील त्याने सांगितले. अभिनेत्री कदाचित त्याच्या रिसॉर्टमध्ये काम करत असावी आणि बदनाम करण्यासाठी आरोप केले असावेत असेही बाबूराज म्हणाला. तसेच सध्या बाबूराज मल्याळम मुव्ही आर्टिस्ट असोसिएशनच्या महासचिव पदाच्या उमेदवार आहे त्यामुळे विरोधकांनी अडकवण्यासाठी ही खेळी असू शकते असेही त्यांचे म्हणणे आहे.