मराठी चित्रपट दिग्दर्शिका स्वप्ना जोशी यांच्या अंधेरी पश्चिम येथील घरात चोरी झाली असल्याचं समोर आलं आहे. स्वप्ना या सहाव्या मजल्यावरील थ्री बीएचके फ्लॅटमध्ये राहत होत्या. घरात झालेला हा चोरीचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. चोराने ड्रेनेज पाईपचा आधार घेत खिडकीद्वारे त्यांच्या घरात शिरकाव केला. रविवारी पहाटे ३.१० ते ३.३०च्या दरम्यान ही घटना घडली असल्याचं स्वप्ना यांनी सांगितलं. सदर प्रकार लक्षात आल्यानंतर स्वप्ना यांनी तातडीने पोलिसांत धाव घेत, तक्रार नोंदवली आहे. (Marathi Director Swapna Waghmare Joshi)
स्वप्ना जोशी यांच्या घरात झालेल्या या चोरीबाबत त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये हा चोर त्यांच्या घरात शिरताना दिसत आहे. घरात शिरताच त्याने सर्वप्रथम मांजराकडे पाहिलं आणि तो किचनच्या दिशेने वळला. या दरम्यान त्याने हॉलमधील वस्तूंवर देखील नजर फिरवली. त्यांनतर त्याने एका बेडरुममध्ये डोकावून पाहिलं आणि तो पुढे गेला.
आणखी वाचा – Video : गिरगावच्या चाळीत दहीहंडीमध्ये मनसोक्त नाचायचे प्रदीप पटवर्धन, जुना व्हिडीओ व्हायरल, चाहतेही भावुक
पुढील खोलीत त्यांची आई बेडवर झोपली होती. तर, त्यांची केअर टेकर खाली झोपली होती. तर पुढच्या बेडरूममध्ये स्वतः स्वप्ना झोपल्या होत्या. हा चोर त्यांच्या रुममध्ये शिरणारच मात्र कुत्रा असल्याने तो सावध झाला. इतक्यात तो तिसऱ्या बेडरूममध्ये शिरला. या रुममध्ये स्वप्ना यांची मुलगी व जावई झोपले होते. या रुममध्ये शिरताच चोराने तिथे ठेवलेलं पाकिट उचलून त्यातून ६ हजार रुपये काढले. पाळीव मांजरीच्या हुशारीने स्वप्ना यांचे जावई देवेन यांना जाग आली. ते चोर चोर म्हणून ओरडत त्याने चोराला पकडण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र, चोराने थेट खिडकी बाहेर उडी टाकून खाली जाण्याचा प्रयत्न केला.
स्वप्ना यांनी टाइम्स ऑफ इंडियाला असे सांगितले की, “चोराने हल्ला केला असता, तर काय झाले असते. या भयंकर विचाराने अजूनही थरथरत आहेत. मी अजूनही धक्क्यातून सावरलेले नाही. अजूनही माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवल्याचा भास होतो, काही अनोळखी व्यक्ती अजूनही घराभोवती लपून बसल्या असाव्यात असं सतत वाटत आहे”.