गुरूवार, मे 29, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रसिद्ध अभिनेत्रीचं गरोदरपणाच्या आठव्या महिन्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन, बाळ आयसीयुमध्ये अन्…

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 1, 2023 | 3:14 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Malayalam TV actress passed away

प्रसिद्ध अभिनेत्रीचं गरोदरपणाच्या आठव्या महिन्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन, बाळ आयसीयुमध्ये अन्...

दाक्षिणात्य अभिनेत्री रेंजुषा मेननच्या निधनानंतर संपूर्ण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला. रेंजुषाच्या निधनानंतर आता आणखी एका अभिनेत्रीच्या निधनाची धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री डॉ प्रिया हिचं निधन झालं आहे. ती ३५ वर्षांची होती. डॉ प्रियाच्या निधनानंतर याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली. ती आठ महिन्यांची गरोदर होती. अभिनेता किशोर सत्याने याबाबत फेसबुक पोस्ट शेअर करत माहिती दिली. तसेच फेसबुक पोस्टद्वारे निधनाचं कारणही त्याने सांगितलं.

मंगळवारी (३१ ऑक्टोबर) हृदयविकाराच्या झटक्याने प्रियाचं निधन झालं. किशोर सत्याने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं की, “मल्याळम टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. डॉ प्रियाचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ती आठ महिन्यांची गरोदर होती. तिचं बाळ आता आयसीयुमध्ये आहे. तिला इतर कोणताच शारीरिक त्रास नव्हता. नियमित तपासणीसाठी ती रुग्णालयामध्ये जात होती. तरीही तिला हृदयविकाराचा झटका आला”.

आणखी वाचा – लग्न होऊनही एकत्र राहत नाहीत अंकिता लोखंडे व विकी जैन, अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली, “हनिमूननंतर…”

“एकुलत्या एक मुलीच्या निधनामुळे तिची आईही हादरुन गेली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून तिची काळजी घेणाऱ्या तिच्या नवऱ्याची अवस्था शब्दांमध्ये सांगू शकत नाही. रात्री रुग्णालयामध्ये गेल्यानंतर प्रियाच्या कुटुंबियांची कशाप्रकारे समजूत घालावी हेच मला कळत नव्हतं. इतक्या चांगल्या लोकांबरोबर देव असं का वागतो? रेंजुषाच्या निधनाचं दुःख पचवण्यापूर्वी आणखी एक निधन समोर आलं”.

आणखी वाचा – १५ वर्षांचा संसार, मतभेद अन्…; सुप्रसिद्ध मराठी अभिनेते किरण करमरकरांचा घटस्फोट का झाला?, ‘बिग बॉस’च्या घरात आहे पूर्वाश्रमीची पत्नी

View this post on Instagram

A post shared by Kishor Satya (@kishor.satya)

“३५ वर्षांच्या व्यक्तीचं जेव्हा निधन होतं तेव्हा शोक व्यक्त करणंही योग्य वाटत नाही. प्रियाचे कुटुंबिय आणि तिचा पती यामधून कसं बाहेर येणार?. या दुःखावर मात करण्याची ताकद त्यांना मिळो”. ‘करुथमुथु’ मालिकेमध्ये प्रिया दिसली होती. लग्नानंतर तिने कलाक्षेत्रामधून ब्रेक घेतला होता. प्रियाच्या निधनानंतर संपूर्ण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

Tags: entertainmententertainment newssouth actress
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Vaishnavi hagawane death case
Social

“संशय होता तर लग्न का केलं?”, वैष्णवी हगवणेवर केलेल्या आरोपांवर कस्पटे कुटुंबियांचा सवाल, पैशांसाठी लग्न करुन…

मे 29, 2025 | 2:05 pm
Girish Pardeshi Video On Fraud Alert
Entertainment

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या पत्नीला ऑनलाइन जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न, हजारो रुपये Gpay वर पाठवले सांगून…; धक्कादायक प्रकार समोर

मे 29, 2025 | 1:30 pm
Vaishnavi Hagawane Death Case
Entertainment

वैष्णवीचे परपुरुषाशी संबंध, चॅट अन्…; वकिलांच्या आरोपांवर भडकला मराठी अभिनेता, म्हणाला, “बुरसटलेले, चुकीचे पुरुषी विचार…”

मे 29, 2025 | 12:58 pm
Vaishnavi Hagawane death
Social

“वैष्णवीचे व्हाट्सअप चॅट तपासा”, हगवणे कुटुंबाचा वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय, वकील म्हणाले, “त्या तरुणाचा साखरपुडा…”

मे 29, 2025 | 12:18 pm
Next Post
Manasi Naik Troll

"वो चाँद की क्या जरुरत है…", घटस्फोटादरम्यान मानसी नाईक साजरा करतेय करवा चौथ, नेटकरी म्हणाले, "नवऱ्याला सोडून दिलंस अन्…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.