शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“पोटगीत मिळालेल्या पैशांमुळे मलायका आरोरा महागडे कपडे परिधान करते?” आरोप करणाऱ्या व्यक्तीवर भडकली अभिनेत्री, सडेतोड उत्तर देत म्हणाली…

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 10, 2024 | 3:02 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Malaika arora talk on a person wrote she could afford expensive dress because of fat alimony see the details

“पोटगीत मिळालेल्या पैशांमुळे मलायका आरोरा महागडे कपडे परिधान करते?” आरोप करणाऱ्या व्यक्तीवर भडकली अभिनेत्री, सडेतोड उत्तर देत म्हणाली...

बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही नेहमीच तिच्या स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत असते. मात्र अभिनेत्री तिच्या कामाशिवाय वैयक्तिक कारणांमुळेच अनेकदा चर्चेत आली आहे. मलायकाने वयाच्या अवघ्या २५व्या वर्षी अरबाज खानबरोबर लग्न केले. मात्र १९ वर्षांनंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अशातच आता मलायकाने इतक्या वर्षांनंतर तिच्या घटस्फोटावर मौन सोडले आहे आणि अरबाजपासून वेगळे झाल्यानंतर तिला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागले याबद्दल सांगितले आहे.

मलायकाने अरबाजपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतल्यानंतर तिला अनेक वाईट प्रसंगांना सामोरे लावे लगल्याचे म्हटले. याचदरम्यान मलायकाला घटस्फोटामध्ये पोटगी म्हणून मिळलेल्या पैशांमुळे ती इतके महागडे कपडे परिधान करत असल्याच्यादेखील अनेक चर्चा रंगल्या होत्या. यावर आता अभिनेत्रीने सडेतोड उत्तर दिलं आहे. नुकत्याच पिंकविलालं दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या घटस्फोटाबद्दल भाष्य केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

यावेळी मलायका असं म्हणाली की, “काही वर्षांपूर्वी माझ्याविषयी छापून आलेल्या एका लेखात एका व्यक्तीने मला घटस्फोटात पोटगी म्हणून खूप पैसे मिळाले होते म्हणून मी महागडे कपडे परिधान करते असं म्हटलं होतं. मला हे वाचून खूपच धक्का बसला होता. मला याचे खूपच वाईट वाटले होते. मला वाटतं एखाद्याची आर्थिक स्थिती ही त्याच्या भूतकाळातील निर्णयावर कधीच अवलंबून नसते”.

आणखी वाचा – अर्जुन बिजलानीच्या प्रकृतीबाबत समोर आली मोठी अपडेट, पत्नी नेहा स्वामीने खास पोस्ट शेअर करत दिली माहिती, म्हणाली, “प्रत्येकाच्या प्रार्थना आमच्यासाठी…”

यापुढे “तुम्ही आयुष्यात काहीही केले, कुठेही पोहोचलात, याने काहीच फरक पडत नाही. कारण लोकांच्या मते तुम्ही जे कुणी आहात ते तुम्हाला मिळालेल्या पोटगीमुळेच. तुमच्या कामाला आणि मेहनतीला काहीच किंमत नसते” असं म्हणत सडेतोड उत्तर दिलं आहे.  

आणखी वाचा – “गोष्टी वाढवून सांगितल्या…”, ‘प्रचारकी’ चित्रपटांबद्दल किरण करमरकरांनी मांडलं स्पष्ट मत, म्हणाले, “त्या दोघांबद्दल…”

दरम्यान, मलायका तिच्या घटस्फोटाच्या निर्णयाबद्दल असं म्हणाली की, “मला माझ्यासाठी, माझ्या करिअरसाठी, माझ्या आवडी-निवडीबद्दल घटस्फोट घेणे जरूरी वाटले. मला माझ्या मुलाला आनंदी ठेवायचे असेल तर मला आतून ठीक वाटले पाहिजे. त्यामुळे मी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटाकडे प्रत्येकजण वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो”.  

Tags: bollywood actressbollywood newsentertainment newsmalaika aroraMalaika Arora DivorceMalaika Arora Divorce Newsबॉलीवूड अभिनेत्रीबॉलीवूड बातमीमलायका आरोरामलायका आरोरा घटस्फोटमलायका आरोरा घटस्फोट बातमी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
Shaitaan to show time list of movies and series upcoming ott releases see the details

अजय देवगणचा ‘शैतान’ ते इम्रान हाश्मीचा ‘शोटाइम’, येत्या आठवड्यात ओटीटीवर अनुभवता येणार मनोरंजनाची मेजवानी, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.