मराठी मनोरंजन इतिहासात काही नावं अशी आहेत जी कधी कधी कानावर पडली तरीही तोंडावर हसू येत. त्यांचा अभिनय त्यांना नेहमी लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला भाग पाडतो. चित्रपट, नाटकं, मालिका यांमध्ये असलेले कलाकार त्यांच्या अभिनयाच्या जोरावर तिथपर्यंत पोहचलेले असतात. त्यांचा त्यामागचा संघर्ष ही तितकाच कठोर असतो. पण त्यांचा अभिनय, जिद्द, कला त्यांच्या आजच्या यशाचं कारण ठरते. त्या संघर्ष मध्ये काही धमाल किस्से ही असतात जे कलाकार विविध माध्यमांच्या मार्फत प्रेक्षकांसोबत शेअर करत असतो. असाच एक गमतीदार किस्सा घडलेला अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या सोबत.(makrand anaspure)
मकरंद अनासपुरे हे नाव जरी ऐकलं तरी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू येत त्याच कारणही तसेच आहे आपल्या विनोदी अभिनय शैलीने आणि विनोदाच्या अचूक टायमिंगने मकरंद अनासपुरे यांची वेगळी ख्याती आहे. पारंपरिक विनोद हटके शैलीत करणं ही मकरंद यांची खासियत. चित्रपट, नाटकांसोबतच सुरुवातीला अनासपुरे यांनी जाहिरातींमध्ये सुद्धा काम केले अगदी मुंबई ते चेन्नई पर्यंत मकरंदयांची जाहिरातीसाठी मागणी होती. या जाहिरातींच्या दरम्यान असाच एक गमतीदार किस्सा मिस्टर अँड मिसेस अनासपुरे यांच्या सोबत घडला. मकरंद अनासपुरे यांनी ही घटना एका मुलाखतीत सांगितली होती.
असा घडला किस्सा..(makarand anaspure)
तर घडलं असं मकरंद अनासपुरे यांना जाहिराती साठी मिशी काढावी लागली होती. त्या जाहिरातीसाठी त्यांना चांगली किंमत सुद्धा मिळाली होती. या शूटिंग नंतर घरी घडलेल्या प्रकाराबद्दल मकरंद यांनी सांगितलं ‘ शूटिंग संपवून मी घरी गेलो दरवाजाची बेल वाजवली समोरून दरवाजा उघडला गेला बायकोने माझा मिशी नसलेला अवतार बघून किंचाळत जोरात दरवाजा लावला. थोडा वेळ खात्री पाटल्या नंतर बायकोने दरवाजा उघडला आणि मला बघून म्हणाली काय अवतार केलाय हा, मिशी का काढली? तर मी म्हणालो जाहिरातीसाठी काढावी लागली हे ऐकून ती म्हणाली पैसे मिळतील म्हणून काहीही कराल. पण जेव्हा १० हजार रुपयांचा चेक तिच्या हातात दिला तेव्हा ती म्हणाली असुद्या असुद्या या घरात. मकरंद अनासपुरे यांनी सांगितलेला हा किस्सा ऐकून मुलाखतीच्या ठिकाणी एकच हशा पिकला.
=====
हे देखील वाचा – ‘इस्राईल’लाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची भुरळइस्राईल सरकारचा ‘हा’ ऐतिहासिक निर्णय
या संबंधित जेव्हा मिसेस अनासपुरे यांनी मकरंद यांचा अवतार पाहून जोरात दरवाजा बंद केला आणि जेव्हा नीट पाहिलं तेव्हा म्हणाल्या ‘ काय अवतार केलाय हा? विदुशकासारखे दिसताय’ असं त्या मकरंद याना म्हणाल्या. साहजिक ते एवढं सिरीयस न्हवत पण किस्सा सांगताना मकरंद यांच्या चेहऱ्यावरचं हसू या क्षणाला एक महत्व देऊन जात.(makrand anaspure)