Kaun Banega Crorepati Season 15 : जगप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते महानायक अमिताभ बच्चन हे गेल्या अनेक दशकांपासून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहेत. चित्रपटांसोबतच आणखी एका ठिकाणी कार्यक्रमासाठी अमिताभ बच्चन हे प्रामुख्याने ओळखले जातात तो कार्यक्रम म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती’. या कार्यक्रमात अमिताभ बच्चन निवेदकाच्या भूमिकेत दिसतात. त्यांची प्रश्न विचारण्याचीशैली संपूर्ण जगात प्रसिद्ध झाली आहे. मागील १४ पर्वानंतर आता केबीसीच नवीन पर्व देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा असते. अमिताभ बच्चन आणि त्यांच्या विशिष्ट शैली प्रमाणेच कार्यक्रमाचा सेट आणि स्वरूप देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत. परंतु यंदा मेकर्सने कार्यक्रमाच्या स्वरूपात अनेक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. स्पर्धकाला दिल्या जाणाऱ्या लाईफलाईन्स, कार्यक्रमातील विशिष्ठ संगीत, सेट या गोष्टींमध्ये बदल पाहायला मिळणार आहेत.
यंदा स्पर्धकाला करताना येणार नाही ‘फोन ऑफ फ्रेंड’(kbc 15)
केबीसी मध्ये स्पर्धकाला कोणत्या प्रश्नाचं उत्तर माहित नसल्यास फोन करून नातेवाईक, मित्र कोणाचीही मदत घेण्याची सूट होती मात्र आता ती लाईफलाईन स्पर्धकाला वापरता येणार नाही. त्याऐवजी नवीन लाईफलाईन देण्यात येणार आहे. त्याबद्दल अधिकृत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. तसेच पूर्वीच्या लाइफलाईन्स मधील ‘५०-५०’, ‘आस्क द एक्सपर्ट’ या लाइफलाईन्स देखील हटवण्यात येणार आहेत.
हे देखील वाचा – सुपरस्टार रजनीकांतच्या ‘जेलर’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, एका दिवसातच कमावले तब्बल ‘इतके’ कोटी
‘केबीसी’ या कार्यक्रमात ‘डबल डीप’ या नवीन लाईफलाईनचा समावेश करण्यात आला आहे. या लाईफलाईनमध्ये स्पर्धकाला २ प्रश्न विचारले जातील त्यापैकी एका प्रश्नाचं उत्तर चुकल्यास त्याला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देता येईल आणि ते ऊत्तर बरोबर आल्यास खेळ पुढे चालू ठेवता येईल. तसेच यावर्षीच्या पर्वामध्ये ‘सुपर संदूक’ या नवीन सेगमेंटचा देखील समावेश करण्यात येणार आहे.(Kaun Banega Crorepati Season 15)
हे देखील वाचा – पृथ्वीक प्रतापचं मोठं मन, अमेरिकेत शो करत असताना दत्तू मोरेसाठी केली मोठी गोष्ट, प्रियदर्शिनी म्हणते, “पहिल्या दोन शोनंतर…”
१४ ऑगस्ट पासून ‘कौन बनेगा करोडपती सिझन १५’ला सुरुवात होणार आहे.