बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

समीर चौघुलेंनी औक्षण केलं, सचिन गोस्वामींच्या पाया पडली अन्…; प्राजक्ता माळीच्या पोस्टने वेधलं लक्ष, डान्स, गाणी आणि बरंच काही

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 11, 2023 | 3:06 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Prajakta Mali Birthday Celebration

Prajakta Mali Birthday Celebration

मराठी मालिकाविश्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. छोट्या पडद्यावरून अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिची सिनेसृष्टीतील घोडदौड सुरु केली. यशस्वी अभिनेत्री, शिवाय उत्तम कवियित्री तर ती आहेच. यासोबतच प्राजक्ता एक उत्तम व्यावसायिक देखील आहे. तिने पाहिलेल्या स्वप्नांमधील तीच एक उत्तम व्यावसायिक बनण्याचं स्वप्न तिने पूर्ण केलं आहे. प्राजक्ताचं ‘प्राजक्तराज’ या नावाने ज्वेलरी ब्रँड देखील आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेत्री प्राजक्ता माळी करते. हास्यजत्रेचे चाहतेही प्राजक्ताचे दिवाने आहेत. (Prajakta Mali Birthday Celebration)

एकामागोमाग एक स्वप्न पूर्ण करतानाच प्राजक्ताचं घराचं ही स्वप्न पूर्ण झालं आहे. प्राजक्ताने कर्जत येथे निसर्गाच्या सान्निध्यात फार्महाऊस खरेदी केलं आहे. ‘प्राजक्तकुंज’ असं या फार्महाऊसचं नाव आहे. यंदाचा प्राजक्ताचा वाढदिवस हा खास होता. कारण यंदाच्या तिच्या वाढदिवसाचे खास सेलिब्रेशन हे तिच्या स्वप्नपूर्ती झालेल्या फार्महाऊसवर दणक्यात साजरे करण्यात आले. प्राजक्ताचा यंदाचा वाढदिवस हा हास्यजत्रेतील कलाकार मंडळींनी साजरा केला.

पाहा प्राजक्ताच्या वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन (Prajakta Mali Birthday Celebration)

प्राजक्ताने उशिरा का होईना सेलिब्रेशनची एक खास पोस्ट शेअर केली आहे. यांत तिने म्हटलं आहे की, “यंदाचा वाढदिवस माझा हसून साजरा झाला. माझ्या खास लोकांसोबत, महाराष्ट्राची हस्यजत्रेच्या माझ्या टीमसोबत, मित्र परिवार आणि कुटुंबीयांसोबत मी साजरा केला. या सर्वांनी माझा दिवस अधिक सुंदर बनवला. माझ्या सर्व चाहत्यांचे आणि फॅन पेजेसचे मला आभार मानता आले नाहीत, तुमच्याकडून येणारी प्रत्येक इच्छा माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे”.

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

हे देखील वाचा – “तू गौतमीला इन्स्टाग्रामवर फॉलो का करत नाही”, नेटकऱ्याच्या प्रश्नावर विराजसचं स्पष्ट उत्तर, म्हणाला, “मी फक्त…”

“तुमच्या आशीर्वादाची मला गरज आहे”. असं म्हणत तिने वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो, व्हिडीओ पोस्ट केले आहेत. यांत अभिनेता समीर चौघुलेने प्राजक्ताचं औक्षण केलं आहे, तर प्राजक्ताने दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत”.

हे देखील वाचा – ‘कौन बनेगा करोडपाती’च्या नवीन पर्वात होणार ‘हे’ महत्त्वाचे बदल,असं असणार सेटचं नवं रूप”

प्राजक्ताच्या वाढदिवसानंतर लगेचच ओंकार राऊतचा ही वाढदिवस होता. त्याचाही वाढदिवस प्राजक्ताच्या फार्महाऊसवर साजरा करण्यात आला. ओंकारच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओही प्राजक्ताने सोशल मीडियावरून शेअर केला आहे. तसेच प्राजक्ताच्या फार्महाऊसवर कलाकारांनी गाणी गात धमाल मस्ती ही केली आहे.

Tags: maharashtrachi hasyajatramhjprajakta malisachin goswami
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Aishwarya Narkar About Avinash Narkar

Aishwarya Narkar About Avinash Narkar: "काही बाबतीत आमची मतं…" लग्नाला २५ वर्षांपेक्षा अधिक काळ झाल्यानंतर पहिल्यांदाच संसाराबाबत बोलल्या ऐश्वर्या नारकर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.