मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नवऱ्याचा ‘देवमाणूस’ पाहून भारावली तितीक्षा तावडे, सिद्धार्थ बोडकेचाही आनंद गगनात मावेना, म्हणाला, “ते माझ्यासाठी…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 1, 2025 | 6:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
devmanus Marathi movie

नवऱ्याचा ‘देवमाणूस’ पाहून भारावली तितीक्षा तावडे, सिद्धार्थ बोडकेचाही आनंद गगनात मावेना, म्हणाला, “ते माझ्यासाठी...”

मराठीमध्ये सध्या नवनवीन चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘देवमाणूस’. महेश मांजरेकर व रेणूका शहाणे यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘देवमाणूस’ने प्रेक्षकांसमोर एका वेगळ्या धाटणीची कथा आणली. चित्रपटगृहांमध्ये याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. महेश व रेणुका यांच्यासह सुबोधचीही मुख्य भूमिका चित्रपटात आहे. दिग्गज कलाकार ‘देवमाणूस’मध्ये असताना एक नव तरुण कलाकार भलताच भाव खाऊन गेला. तो म्हणजे सिद्धार्थ बोडके. सिद्धार्थने ‘देवमाणूस’मध्ये साकारलेली भूमिका सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्याने केलेल्या कामाचं प्रेक्षकांकडून भरभरुन कौतुक करण्यात येत आहे. (devmanus Marathi movie)

दिग्गज कलाकारांबरोबर काम करणं हे सिद्धार्थचं स्वप्न होतं. ते ‘देवमाणूस’मुळे सत्यात उतरलं. त्याने त्याच्या वाट्याला आलेली भूमिका उत्तम  पार पाडली. जीव ओतून काम करणाऱ्या सिद्धार्थला सिनेरसिकांकडून कौतुकाची थाप मिळत आहे. यासगळ्यामध्ये बायको तितीक्षाने केलेलं कौतुक सिद्धार्थला आनंद देऊन जाणारं होतं. याचबाबत त्याने भाष्य केलं आहे.

आणखी वाचा – Video : खांद्यावर पदर, मराठमोळा साज अन्…; कार्तिकी गायकवाडचा भावाच्या लग्नासाठी थाट, गायलं खास गाणं

ITSMAJJAला दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थ म्हणाला, “तितिक्षा इतकं मला दुसरं कोणीच ओळखत नाही. सिद्धार्थ म्हणून माझ्या चेहऱ्यावरील छोटे-मोठे हावभाव तिला चोख माहित आहेत. ‘देवमाणूस’ पाहिल्यानंतर आम्ही घरी सगळे बसलो होतो. ती होती अनघा होती. तेव्हा तिने मला सांगितलं की, मला तू कुठेच तू वाटला नाहीस. तिची ही प्रतिक्रिया माझ्यासाठी सरप्राइज होती”.

आणखी वाचा – एकच किडनी, डॉक्टांकडून चुकीचे उपचार, मृत्यू जवळून पाहिला अन्…; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा वाईट काळ, हसऱ्या चेहऱ्यामागे…

“आपल्याला जी व्यक्ती पूर्णपणे ओळखते तिलाच आपण वेगळं वाटलो तर ती माझ्यासाठी महत्त्वाची प्रतिक्रिया होती. अनघा जी माझी खूप चांगली मैत्रीण आहे. तीही मला बोलली की, तू खूप वेगळाच वाटत होतास. तर आपल्याला ओळखणाऱ्या माणसांनी दिलेली प्रतिक्रिया नेहमीच खूप मस्त असते”. यावेळी सिद्धार्थने त्याच्या वाढत्या वजनाविषयही सांगतिलं. एका चित्रपटासाठी त्याने तब्बल १४ ते १५ किलो वजन वाढवलं होतं. मात्र तो चित्रपटच नंतर बंद पडला. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी सिद्धार्थ प्रयत्न करत असतानाच ‘देवमाणूस’ त्याच्याकडे आला. मग वाढलेलं पोट व वजन त्याला या चित्रपटाच्या भूमिकेसाठी उपयोगी ठरलं.

Tags: entertainment newsmarathi actormarathi movie
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Shahrukh Khan On Karan Johar

"स्कर्ट घालावा लागेल आणि…", 'या' कारणास्तव शाहरुख खानने नाकारलेला करण जोहरचा चित्रपट, स्वतःच केला खुलासा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.