शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : पृथ्वीक प्रतापला भेटण्यासाठी व्हॅनिटी व्हॅनबाहेर चाहत्यांची तुफान गर्दी, अभिनेता भारावला, म्हणाला, “अखेरच्या श्वासापर्यंत…”

Majja Webdeskby Majja Webdesk
डिसेंबर 2, 2023 | 11:37 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
maharashtrachi hasyajtra fame actor prithvik pratap shared video of crowd of fans gathering outside the vanity van

Video : पृथ्वीक प्रतापला भेटण्यासाठी व्हॅनिटी व्हॅनबाहेर चाहत्यांची तुफान गर्दी, अभिनेता भारावला, म्हणाला, “अखेरच्या श्वासापर्यंत…"

छोट्या पडदयावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमाने सर्वांचीच मनं जिंकली आहेत. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत. या कार्यक्रमातील प्रत्येक पात्र आता प्रेक्षकांच्या आवडीचे झाले आहेत. आपल्या विनोदाच्या अनोख्या शैलीने या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात स्वत:ची जागा निर्माण केली आहे. अशाच काही कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेता पृथ्वीक प्रताप. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे पृथ्वीकला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. (Prithvik Pratap On Instagram)

पृथ्वीक सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. नुकताच ३० नोव्हेंबर रोजी त्याचा वाढदिवस झाला आणि या वाढदिवसानिमित्त त्याला अनेकांनी सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या होत्या. आणि त्यांच्या शुभेच्छाना धन्यवाद म्हणत त्याने काही स्टोरी त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर देखील केल्या होत्या. अशातच आता त्याने शेअर केलेल्या एका व्हिडीओने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

View this post on Instagram

A post shared by PRITHVIK PRATAP (@kahani_puri_filmy_hai)

आणखी वाचा – रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड, शाहरुख खानच्या ‘पठाण’लाही टाकलं मागे, एका दिवसातच कमावले तब्बल…

पृथ्वीकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओद्वारे त्याने त्याच्या चाहत्यांचे कौतुक व आभार मानले आहेत. त्याने शेअर केलेल्या या व्हिडीओत असंख्य चाहते त्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आले आहेत. आणि त्यांचे हे प्रेम पाहून पृथ्वीक् भरावल्याचे दिसत आहे. चाहत्यांचा हा खास व्हिडीओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये “वाढदिवसानिमित्त तुम्ही सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा घेऊन मी नव्या वर्षात पदार्पण करत आहे. हे प्रेम असच राहूद्या. अखेरच्या श्वासापर्यंत तुमचं मनोरंजन करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करत राहीन”  असं म्हणत हा व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा – “लग्नाला सासरकडून विरोध होता आणि…”, लग्नाच्या बऱ्याच वर्षांनंतर कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत, म्हणाला “माझं दिसणं…”

दरम्यान, त्याच्या या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी अनेक लाईक्स् व कमेंट्स करत त्याला प्रतिसाद दिला आहे. प्रियदर्शिनी इंदलकर, अक्षया नाईक, तन्वी बर्वे सारख्या अनेक कलाकारांनी या व्हिडीओवर कमेंट करत त्याचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर “खुपच छान, ही गर्दी आणखी मोठी होऊ दे, त्या गर्दीत मी पण पाहिजे होतो, मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे, असाच पुढे जात रहा” अशा अनेक कमेंट्स करत त्याला प्रोत्साहन दिले आहे. तसेच त्याचे कौतुकही केले आहे.

Tags: entertainment newsmaharashtrachi hasy jatramarathi actormarathi entertainmentprithvik pratap
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
animal hindi movie upendra limaye mrinmayee godbole and ajay atul dolbywalya song appearance

रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’मध्ये मराठी कलाकारांचीच सर्वाधिक चर्चा, चित्रपटात मराठीतील ‘डॉल्बीवाल्या’ गाणंही वाजतं अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.