रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम सुप्रसिद्ध अभिनेता शूटिंगसाठी पोहोचला कोकणात, व्हिडीओद्वारे दाखवली झलक, म्हणाला…

Saurabh Moreby Saurabh More
जून 29, 2024 | 2:25 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Maharashtrachi Hasyajtra fame Actor Nikhil Bane went to Konkan for shooting and shared special video

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम सुप्रसिद्ध अभिनेता शूटिंगसाठी पोहोचला कोकणात, व्हिडीओद्वारे दाखवली झलक, म्हणाला...

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमाने अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळवून दिली. कोरोना काळात या कार्यक्रमाने अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य खुलवण्याचे काम केले. या शोमधून अनेक कलाकार मंडळी प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचले. अशा अनेक कलाकारांपैकी एक अभिनेता म्हणजे निखिल बने. ‘आज भी दिन बने’ अशा आपली एक वेगळी ओळख निर्माण करत त्याने अनेकांच्या मनात आपले स्थान निर्माण केलं. निखिल हा मूळचा कोकणातला आहे. त्यामुळे तो त्याचं गावावरील प्रेम सोशल मीडियावर अनेक व्हिडीओद्वारे व्यक्त  करत असतो. याआधी त्याने अनेक व्हिडीओ शेअर करत त्याच्या कोकण प्रवासाची सफर घडवून आणली असल्याचे पाहायला मिळाले आहे.

निखिल बनेचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियाद्वारे निखिल नेहमीच काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतो. विशेषतः गावाकडच्या आठवणीही तो चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. आणि त्याच्या या व्हिडीओला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळतो. अशातच त्याने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्याद्वारे त्याने पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांना पुन्हा एकदा कोकणची खास सफर घडवून आणली आहे. या व्हिडीओद्वारे त्याने त्याच्या कोकणातल्या शूटिंगचा अनुभव शेअर केला आहे आणि या व्हिडीओमध्ये त्याचे हास्यजत्रेतील दोन मित्रदेखील आहेत.  

View this post on Instagram

A post shared by Nikhil Bane (@banenikhil)

निखिलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये असं म्हणतो की, “शूटिंगसाठी कोकणात जात आहे आणि याचा आनंद माझ्या चेहऱ्यावर दिसत आहे. त्यानंतर कोकणातील छान पाऊस व निसर्गाचा मनमुराद आनंद घेत आम्ही कोकणातल्या गावी पोहोचलो”. कोकणातील गुहागरमधील नरवण या गावी आम्ही शूटिंग करत असून हा चित्रपट हॉरर असल्याचेही त्याने या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा – ओटीटी विश्वात हृता दुर्गुळेची धमाकेदार एन्ट्री, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाली, “ही सीरिज माझ्यासाठी…”

या व्हिडीओमध्ये निखिलने त्याच्या शूटिंगच्या घराची, मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी भोगदा व कोकणातील खास निसर्गाची झलक दाखवली आहे. त्याचबरोबर यावेळी शूटिंगला त्यांनी काय मजामस्ती केली त्याचेही खास क्षण दाखवले आहेत. त्याचबरोबर निखिल शूटिंग राहत असलेले घर हे १२८ वर्षे जुने असल्याचेही त्याने या व्हिडीओमध्ये सांगितले आहे. कोकणातील गावच्या या व्हिडीओवर निखिलने ‘शूटिंगसाठी कोकणात गेलो’ असं म्हटलं असून या व्हिडीओमार्फत त्याच्या चाहत्यांना कोकणात तो शूटिंग करत असलेल्या गावची खास सफर घडवली आहे.

आणखी वाचा – ईशा अंबानीचा गरोदरपणाबाबत मोठा खुलासा, आईप्रमाणेच IVFद्वारे दिला मुलांना जन्म, म्हणाली, “अजिबात सोपं नाही आणि…”

निखिलने शेअर केलेल्या या व्हिडीओला चाहत्यांनीही लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. या व्हिडीओखाली चाहत्यांनी “इतका मोठा स्टार असूनही तुला अजिबात गर्व नाही”, “नरवन गाव खूप छान आहे”, “तुझ्या या चित्रपटाची आम्ही वाट पाहत आहोत” अशा अनेक कमेंट्स करत या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.       

Tags: Maharashtrachi Hasyajtra Fame Actormarathi entertainment newsnikhil bane
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Actress Hina Khan Health Update

हिना खानला स्तनाचा कर्करोग, सर्वत्र काळजीचं वातावरण, कलाकारांकडूनही पाठिंबा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.