रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ओटीटी विश्वात हृता दुर्गुळेची धमाकेदार एन्ट्री, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाली, “ही सीरिज माझ्यासाठी…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 2, 2024 | 11:58 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Hruta Durgule shared a special post about her debut in the OTT industry

ओटीटी विश्वात हृता दुर्गुळेची धमाकेदार एन्ट्री, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाली, “ही सीरिज माझ्यासाठी...”

मराठी मालिका व चित्रपटांतून आपल्या अभिनयासह सौंदर्याची छाप सोडणारी आणि महाराष्ट्राची क्रश म्हणून ओळखली जाणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळ. मराठीमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर हृता आता हिंदीत पदार्पण करायला सज्ज झाली आहे. हृता ही लवकरच हिंदी वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या ‘कमांडर करण सक्सेना’ या वेब सीरिजमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच हृताने या वेब सीरिजचा टीझर शेअर केला होता. अशातच आता तिने या सीरिजबद्दल सोशल मीडियावर  खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे तिने तिचा आनंद व्यक्त केला आहे.

हृताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे काही खास फोटो शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “माझे जीवन हे अनेक पहिल्या गोष्टींनी भरलेले आहे आणि त्याच पहिल्या गोष्टींमध्ये ही सीरिज येते. त्यामुळे ही सीरिज माझ्यासाठी एक उल्लेखनीय कामगिरी आहे. या सीरिजमध्ये पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना माझा पहिलाच अनुभव आहे. तसेच ॲक्शन सीक्वेन्सचाही माझा पहिला अनुभव आणि या सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझे हिंदी OTT जगात पदार्पण होत आहे. याशिवाय चांगली सुरुवात कुठली असू शकत नाही”.  

View this post on Instagram

A post shared by Hruta Durgule (@hruta12)

आणखी वाचा – कर्क व कुंभ राशीच्या लोकांसाठी शनिवारचा दिवस लाभदायक, नोकरी-व्यवसायात होणार लाभ, जाणून घ्या…

यापुढे हृताने दिग्दर्शक, वहिनी, निर्मिती संस्था यासह तिने तिच्या संपूर्ण टीमचे आभार मानत त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. तसेच देवाने निर्माण करून दिलेल्या या संधीसाठी तिने कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आहे. तिच्या या पोस्टखाली तिला अनेक चाहत्यांनी तिच्या नवीन वेबसीरिजसाठी व हिंदीतील ओटीटीमधील पदर्पणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मराठीतील अनेक कलाकारांनीही तिला तिच्या या नवीन कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा – विरोचकामुळे नेत्राच्या बाळाच्या जीवाला धोका, देवीआई रक्षण करणार का? की विरोचकच नवीन डाव साधणार?

दरम्यान, ‘फुलपाखरू’ या मालिकेमुळे हृता दुर्गुळे ही घराघरात पोहचली. तर, ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील तिची भूमिका चांगलीच गाजली. त्यानंतर ‘अनन्या’, ‘टाईमपास-३’, ‘कन्नी’, ‘सर्किट’ या चित्रपटात तिने दमदार  भूमिका साकारल्या. मराठी मालिका कमाल दाखवल्यानंतर हृता आता हिंदी वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. हृता आता ‘कमांडर करण सक्सेना’ या वेबसीरिज मधून ओटीटी विश्वात आणि हिंदी सिनेविश्वात झळकणार आहे.

Tags: hruta durgulemarathi actressmarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Isha Ambani opened up about giving birth to children through IVF like her mother know more

ईशा अंबानीचा गरोदरपणाबाबत मोठा खुलासा, आईप्रमाणेच IVFद्वारे दिला मुलांना जन्म, म्हणाली, "अजिबात सोपं नाही आणि..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.