सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

हिना खानला स्तनाचा कर्करोग, सर्वत्र काळजीचं वातावरण, कलाकारांकडूनही पाठिंबा

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 29, 2024 | 2:35 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Actress Hina Khan Health Update

हिना खानला स्टेज 3 ब्रेस्ट कॅन्सरचे निदान

जेव्हापासून लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री हिना खानने स्तनाच्या कर्करोगाने ग्रस्त असल्याचे जाहीर केले आहे, तेव्हापासून सर्वत्र काळजीच वातावरण पसरलं आहे. सगळ्या क्षेत्रातून अभिनेत्रीला धीर देत आहेत. अनेक कलाकारांनीही हिना खानला आशीर्वादही दिले आहेत आणि तिला काळजी न करण्याचे आवाहन केले आहे. हिना खानने २८ जूनला सांगितले की, ती ब्रेस्ट कॅन्सरच्या तिसऱ्या स्टेजमध्ये आहे. हिनाने असेही सांगितले की ती मजबूत व खंबीर असून हा लढा देत आहे. आणि आता ती पूर्णपणे ठीक आहे. यावर मात करण्यासाठी ती सर्व काही करण्यास तयार असल्याचेही हिना खानने सांगितले. (Actress Hina Khan Health Update)

हिना खानने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ब्रेस्ट कॅन्सरची बातमी जाहीर केली होती आणि त्या पोस्टवर अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. अंकिता लोखंडे, एकता कपूर, मौनी रॉय, दृष्टी धामी, जेनिफर विंगेट, शहनाज गिल, महिमा चौधरी, श्रद्धा आर्य, सुरभी ज्योती, भारती सिंग, आमिर अली आणि गौहर खान यांच्यासह अनेक कलाकारांनी कमेंट करत हिना खानला धीर दिला आणि तिला लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी दिग्दर्शक समीर विद्वांस अडकला लग्नबंधनात, साधेपणाने वेधलं लक्ष, लग्नातील पहिला फोटो समोर

View this post on Instagram

A post shared by ???????????????? ???????????????? (@realhinakhan)

अंकिता लोखंडेने हिनाच्या या पोस्टवर लिहिलं आहे की, “हिना तू यापेक्षाही मजबूत आहेस. ही वेळही निघून जाईल. तुम्हाला खूप प्रेम पाठवत आहे. देव तुमचे भले करो”. तर आमिर अलीने लिहिले आहे की, “तू खूप मजबूत आहेस. तुम्हाला काही हवे असल्यास, फक्त एक कॉल करा”. बॉलीवूड अभिनेत्री महिमा चौधरी हिने स्वतः ब्रेस्ट कॅन्सरशी लढाई जिंकली आहे. तिनेदेखील हिना खानला धीर दिला आणि लिहिले, “हिना, मी तुला खूप प्रेम व धैर्य पाठवत आहे. तू एक सेनानी आहेस आणि मला माहित आहे की तू ठीक होशील. लाखो लोकांच्या प्रार्थना तुमच्या पाठीशी आहेत. या कठीण काळात मी तुझा हात धरीन”.

आणखी वाचा – “पायलने एखाद्या पुरुषाला घरी आणलं तर ?”, पत्नीबाबत प्रश्न विचारताच अरमान मलिक भडकला, म्हणाला, “तिने असं केलं तर…”

याआधी हिना खान एप्रिल २०२४ मध्ये आजारी पडल्याची माहिती आहे. त्यानंतर तिने इंस्टाग्रामवर एका पोस्टमध्ये सांगितले की ती अनेक आरोग्य समस्यांशी झुंजत आहे.

Tags: Actress Hina Khan Health Updateentertainmenthina khanHina Khan Diagnosed With Breast Cancer
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Bigg Boss Marathi 6 Winner
Entertainment

‘बिग बॉस मराठी’ सीझन ६ची विजेती ठरली तन्वी कोलते, ट्रॉफीसह मिळवली इतकी रक्कम, कौतुकाचा वर्षाव

एप्रिल 20, 2026 | 10:15 am
Next Post
Kranti Redkar shared a special video on social media of celebrating his father's 84th birthday

Video : वडिलांचा ८४वा वाढदिवस, खास सेलिब्रेशन अन्...; क्रांती रेडकरच्या आई-वडिलांचे प्रेम पाहून नेटकरीही भारावले

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.