शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची गिनीज बुकमध्ये नोंद होणार, निर्मात्यांनी सांगितलं कारण, म्हणाले, “लवकरच…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 6, 2024 | 7:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Maharashtrachi Hasyajatra show will soon be make Guinness Book of World Records makers said the reason

या कारणासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची गिनीज बुकमध्ये नोंद होणार

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरांत लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळते. म्हणूनच जगाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या मराठमोळ्या प्रेक्षकांसाठी हास्यजत्रेच्या लाइव्ह शोजचं आयोजन केलं जातं. नुकतेच हे सगळे कलाकार त्यांच्या दुसऱ्या अमेरिका दौऱ्यावर गेले होते. त्यामुळे काही महिन्यांपासून हा शो ब्रेकवर होता. आता पुन्हा एकदा या शोचा नवा सीझन प्रेक्षकांचा भेटीला आला आहे. (maharashtrachi hasyajatra)

सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम जगभरात प्रसिद्ध आहे. या कार्यक्रमातील विनोदवीरांनी त्यांच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. या शोने कोरोना काळात प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केलं. त्यामुळे प्रेक्षकांनी या शोवर भरभरुन प्रेम केलं. त्यामुळे आता हा शो लवकरच रेकॉर्ड करणार आहे आणि याबद्दल शोच्या निर्मात्यांनी खुलासा केला आहे. शोच्या नवीन सीझननिमित्त झालेल्या पत्रकार परिषदेत निर्मात्यांनी याबद्दल भाष्य केलं.   

आणखी वाचा – “मनोरंजन क्षेत्रात करिअर का करत नाही?”, लोकांच्या प्रश्नावर प्रथमेशच्या बायकोचं उत्तर, म्हणाली, “चर्चेत राहणं…”

यावेळी अमित फाळके यांनी असं म्हटलं की, “‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा सर्वांचा आवडता कार्यक्रम आहे हे साहजिकच आहे. त्यामुळे या टीमचं मला कौतुक करताना आनंद होत आहे. कारण, मी काही आकडे शेअर करत आहे, ज्यामागे या टीमची खूप मेहनत आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे आतापर्यंत ८३७ ओरिजिनल भाग प्रसारित झाले आहेत. ८३७ ओरिजिनल भाग म्हणजे आता पर्यंत या शोमध्ये दोन हजार पाचशे स्किट्स झाले आहेत. दोन हजार पाचशे स्किट्स लेखकांच्या टीमने लिहणे आणि ते या कलाकरांनी सादर करणं या हळूहळू एका रेकॉर्डकडे जाणारा प्रवास आहे”.

आणखी वाचा – सासूबाईंचा खरा चेहरा सर्वांसमोर आणण्याचा अक्षराचा निर्धार, भुवनेश्वरीचा तिला पलटवार, अधिपती कुणाला साथ देणार?

यापुढे ते असं म्हणाले की, “आज मला हे सांगायला आनंद होत आहे की, महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोचा प्रवास गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होईल का? यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे आम्ही लवकरच ही आनंदाची बातमी देऊ की, महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे”. दरम्यान, तब्बल सहा वर्षांहून जास्त काळ ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. अशातच आता कॉमेडीची हॅटट्रीक घेऊन हा शो पुन्हा एका प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Tags: maharashtrachi hasya jatra comedy showmaharashtrachi hasya jatra laughter showmaharashtrachi hasyajatra
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
07 december 2024 daily horoscope will be many ups and downs in the life of Scorpio people on Saturday

07 December Horoscope : वृश्चिक राशीच्या लोकांच्या आयुष्यात शनिवारी अनेक चढ-उतार येणार, तुमच्यासाठी दिवस कसा? जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.