Maharashtraci Hasyajatra fame Prabhakar More : सध्या सर्वत्र नवरात्रीनिमित्त धुमाकूळ सुरु असलेला पाहायला मिळत आहे. दांडिया, गरबा खेळण्यासाठी अनेकजण उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, नवरात्रोत्सवानिमित्त अनेक मोठ्या मंडळांमध्ये कलाकारांची खास हजेरी असल्याचं पाहायला मिळालं. अनेक कलाकार नवरात्रीनिमित्त गरबा, दांडिया खेळताना दिसले. अशातच नवरात्रीच्या कार्यक्रमात एका मराठमोळ्या अभिनेत्याला खास आमंत्रण देण्यात आले. हा अभिनेता म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रभाकर मोरे. डोंबिवलीतील एका नवरात्रीच्या कार्यक्रमासाठी प्रभाकर मोरे यांना आमंत्रित केले होते.
प्रभाकर मोरे यांनी या कार्यक्रमाला भेट दिल्याचा एक व्हिडीओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्यांची डोंबिवलीतील एका मंडळाला दिलेली भेट खास असल्याचं पाहायला मिळालं. प्रभाकर यांच्या उपस्थितीने प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहताना पाहायला मिळाला. त्यांच्या एंट्रीमध्येच ते चाहत्यांच्या गर्दीत रमून गेले. प्रभाकर मोरे चाहत्यांच्या गर्दीत हरवल्याचे दिसले. यावेळी अनेक चाहते लहान मुलांबरोबर फोटो काढताना दिसले.
आणखी वाचा – महेश मांजरेकरांच्या पहिल्या पत्नीचे निधन, आईच्या आठवणीत लेक सत्याची भावुक पोस्ट, म्हणाला…
तर प्रभाकर मोरेही स्वतःच्या हाताने चाहत्यांबरोबर फोटो आणि सेल्फी घेताना दिसले. इतकंच नव्हेतर ते स्वतः चाहत्यांबरोबर मैदानात येत गरबा खेळताना दिसले. अर्थात या व्हिडीओनंतर त्यांच्या साधेपणाचं भरभरुन कौतुक होताना पाहायला मिळालं. “कोकणी माणूस एकदम साधा भोळा असतो. आमचो गाववालो मोरे भाऊ”, “अग शालू झोखा दे मैना, जबरदस्त”, अशा कमेंट करत चाहत्यांनी त्यांच्या साधेपणाचं कौतुक केलं आहे. याशिवाय अनेकांनी या व्हिडीओला पसंती दर्शविली आहे.
आणखी वाचा – टीव्ही अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा आगीत होरपळून मृत्यू, धाकटा होता प्रसिद्ध बालकलाकार
महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोने प्रभाकर मोरे यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. आपल्या खास शैलीत कोकणी भाषा आणि त्या भाषेतील विविध भूमिका साकारत आणि विनोदाच्या अचूक टायमिंगने आजवर त्यांनी प्रेक्षकांना खळखळवून हसवले. त्यांच्या हटके स्किटने नेहमीच ते चाहत्यांचं भरभरुन मनोरंजन करतात. अभिनयाबरोबरच ते सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असलेले पाहायला मिळाले आहेत.





