बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

किस करायला जवळ आले आणि…; अभिनेत्रीने सुप्रसिद्ध निर्मात्यावर गंभीर आरोप करताच सोडलं मौन, म्हणाले, “आजकाल प्रसिद्धीसाठी…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 29, 2025 | 4:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Actress Allegations to Producer

किस करायला जवळ आले आणि…; अभिनेत्रीने सुप्रसिद्ध निर्मात्यावर गंभीर आरोप करताच सोडलं मौन, म्हणाले, "आजकाल प्रसिद्धीसाठी…"

Actress Allegations to Producer : ‘हाउस अरेस्ट’,’गंदी बात 3′ आणि ‘जुली’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसलेली अभिनेत्री नेहल वडोलिया यांनी दिग्गज चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई यांच्या नावावर आरोप केला. सुभाष घई हे सुप्रसिद्ध दिदर्शक व निर्माते आहेत. अभिनेत्रीने असा दावा केला होता की त्यांनी हॉटेलच्या खोलीत ओठांवर चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. जेव्हा ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली, तेव्हा चित्रपट निर्मात्याने यावर भाष्य करणं अचूक समजलं आणि आपली बाजू सोशल मीडियाद्वारे मांडत असे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले.

‘गलाटा इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत नेहलने सांगितलं, “मी माझ्या मॅनेजरला डेट करत होते. एकेदिवशी तो मला सुभाष घईंच्या भेटीला घेऊन गेला. आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो तिथे दोन खोल्या होत्या. त्यातील एका रुममध्ये काही लोक मद्यपान करत होते. तेव्हा सुभाष घई मला म्हणाले की, ‘चल मी तुला बाल्कनी दाखवतो. इथून संपूर्ण शहर कसं दिसतं, ते दाखवतो’. मी बाल्कनीतून बाहेर पाहत होते, तेव्हा ते माझ्याकडे एकदम जवळून पाहत उभे होते. मग ते मला म्हणू लागले की, तू खूप सुंदर हसतेस. तू बॉलिवूडमध्ये खूप काही करु शकतेस. तुझं खूप मोठं नाव होईल. तू खूप सेक्सी आहेस, असं ते बडबडू लागले”.

आणखी वाचा – टीव्ही अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा आगीत होरपळून मृत्यू, धाकटा होता प्रसिद्ध बालकलाकार

View this post on Instagram

A post shared by SG (@subhashghai1)

अभिनेत्री पुढे म्हणाली, “त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन मी दुसऱ्या रुममधील वॉशरुममध्ये गेली. तेव्हा तिथेसुद्धा ते माझ्या मागेमागे आले. ते माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होते. ते मला किस करण्यासाठी जवळ येत होते. मी घाबरून तोंड वळवलं तर त्यांनी माझ्या गालावर किस केलं”, असा धक्कादायक अनुभव नेहलने मुलाखतीदरम्यान सांगितला.

आणखी वाचा – रुपाली भोसलेच्या नव्या गाडीचा अपघात, मोठं नुकसान पण अभिनेत्री सुखरुप, व्हिडीओद्वारे दाखवली झलक

या व्हायरल झालेल्या बातमीनंतर सुभाष घई यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर घराच्या गार्डनचा एक फोटो शेअर करत या प्रकरणावर मौन सोडलं. “जर एखादं मूल तुमच्याकडे मदतीसाठी आलं, तर त्यांच्या व्यावसायिक प्रवासात त्यांना मदत करणं आणि मार्गदर्शन करणं हे एका वरिष्ठाचं कर्तव्य असतं. परंतु आजकाल प्रसिद्धीसाठी खऱ्या किंवा खोट्या विधानांसह सोशल मीडियावर झळकू इच्छिणाऱ्या अनोळखी लोकांना भेटणं भीतीदायक आहे. आजकाल मी जे काही ऐकतोय, त्यावरुन इतकंच म्हणेन की देव त्यांना आशीर्वाद देवो. आदरपूर्वक करिअर घडवण्यासाठी एकमेकांचा सन्मान करणं गरजेचं असतं”.

Tags: Nehal vadoliyasubhash ghaisubhash ghai director
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
 myra vaikul

वाईट कमेंट्स, घाणेरडे रील आणि…; ट्रोलिंगवर मराठमोळी मायरा वायकुळ स्पष्टच बोलली, म्हणाली, "खूप भयानक…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.