शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : हातगाडीवर नाश्ताचे पदार्थ विकत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ बघत होती महिला, प्रियदर्शिनी इंदलकरने पाहिलं अन्…; व्हिडीओ तुफान व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 21, 2024 | 12:51 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Maharashtrachi Hasyajatra Fan Moment

Video : हातगाडीवर नाश्ताचे पदार्थ विकत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' बघत होती महिला, प्रियदर्शिनी इंदलकरने पाहिलं अन्…; व्हिडीओ तुफान व्हायरल

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे लाखो चाहते दिवाने आहेत. आजवर या कार्यक्रमाला अनेकांची पसंती पाहायला मिळाली. वेगवेगळ्या विषयांवर विनोदी पद्धतीने केलं जाणारं सादरीकरण हे प्रेक्षकांच्या देखील चांगलंच पसंतीस उतरलेलं पाहायला मिळतं आहे. कोरोना काळात देखील प्रेक्षकांना हास्यजत्रा हे मनोरंजनाचं एक उत्तम साधन होतं. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून अनेक कलाकार गेल्या अनेक काळापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. (Maharashtrachi Hasyajatra Fan Moment)

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात कलाकारांच्या यादीत समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, अरुण कदम, प्रभाकर मोरे, गौरव मोरे, शिवली परब, यांसह अन्य कलाकारांचा देखील समावेश आहे. हास्यजत्रेत या कलाकारांनी केलेली धमाल साऱ्या रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. अनेक चाहते असेही आहेत की, ज्यांना महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम पाहिल्याशिवाय घासही उतरत नाही. तर अनेकजण कामावरुन, थकून भागून आल्यानंतर मूड फ्रेश करण्यासाठी हास्यजत्रा आवर्जून पाहतात.

आणखी वाचा – फेक अकाऊंट बनवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध विद्या बालनची पोलिसांमध्ये धाव, एफआयआर दाखल, नोकरी देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक अन्…

तर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे असे बरेच चाहते आहेत जे काम करतानाही हास्यजत्रा पाहतात. नुकतीच हास्यजत्रेतील कलाकार प्रियदर्शनी इंदलकरने हास्यजत्रेच्या एका चाहतीची स्टोरी पोस्ट केली आहे. प्रियदर्शनीच्या या स्टोरीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यांत प्रियदर्शनीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये हातगाडीवर नाश्ताचे पदार्थ विकणाऱ्या ताई, काम करता करता हास्यजत्रा पाहत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत, अभिनेत्रीने, “मनोरंजन थांबलं नाही पाहिजे”, असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – Dadasaheb Phalke Awards 2024 : सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला शाहरुख खान, तर बॉबी देओलचाही सन्मान, वाचा संपूर्ण यादी

कामातून एक विरंगुळा म्हणून वा मूड फ्रेश राहण्यासाठी ही मंडळी हास्यजत्रेला नेहमीच प्राधान्य देताना दिसतात. केवळ महाराष्ट्रातचं नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही या शोचे चाहते आहेत. परदेशातील या चाहत्यांच्या भेटीसाठी हास्यजत्रेतील कलाकार परदेश दौराही करताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच हास्यजत्रेतील कलाकार सिंगापूर दौऱ्याहून परतले आहेत. सिंगापूर येथेही त्यांना त्यांच्या चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं.

Tags: entertainmentfunny video maharashtrachi hasyajatramaharashtrachi hasyajatraMaharashtrachi Hasyajatra Fan Moment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Late actor Rituraj Singh's family became emotional at his last funeral the video viral on social media

Video : ऋतुराज सिंह यांच्या अंत्यदर्शनाला कुटुंबियांची बिकट अवस्था, उपस्थितही हळहळले, कलाकारांची तुफान गर्दी अन्...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.