शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सिंगापूरमध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ पाहण्यासाठी जमली तुफान गर्दी, वनिता खरातने दाखवली झलक, म्हणाली, “सार्थ अभिमान…”

Saurabh Moreby Saurabh More
मे 28, 2024 | 10:49 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Maharashtrachi Hasyajatra fame Vanita Kharat shared a special video of Singapore tour.

सिंगापूरमध्ये 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' पाहण्यासाठी जमली तुफान गर्दी, वनिता खरातने दाखवली झलक, म्हणाली, “सार्थ अभिमान...”

छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात आपले एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. गेली अनेक वर्षे हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. त्यामुळे या शोचे फक्त महाराष्ट्र व भारतातच नव्हे तर भारताबाहेरही अनेक चाहते आहेत. या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यामुळे हास्यजत्रेची टीम भारताबाहेरील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी अनेकदा गेले असल्याचे पाहायला मिळाले. अशातच या टीमने नुकताच सिंगापूर दौराही केला.

हास्यजत्रेची संपूर्ण टीम यापूर्वी अमेरिका, ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा हे हास्यवीर कलाकार सिंगापूरमधील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी गेले होते. याबद्दलचा एक खास व्हिडीओ वनिता खरातने तिच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे. सोशल मीडियावर वनिता मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांना अपडेट देत असते. अशातच तिने शेअर केलेला हा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Vanita Kharat (@vanitakharat19)

आणखी वाचा – ८०० व्हीआयपी पाहुणे, ४३८० किलोमीटर समुद्राचा प्रवास अन्…; अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये काय काय असणार?, Inside Details

सिंगापुर दौऱ्याचा खास व्हिडीओ शेअर करत वनिताने सिंगापुरच्या प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. हा खास व्हिडीओ शेअर करत वनिताने असं म्हटलं आहे की, “महाराष्ट्राच्या हास्यजत्रेला आता फक्त महाराष्ट्रात नाही तर जगभरातील प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळतंय आणि आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे. सिंगापूरमधील प्रेक्षकांनी इतकं प्रेम दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद”. या व्हिडीओमध्ये वनितासह नम्रता संभेराव, चेतना भट, ओंकार राऊत, पृथ्विक प्रताप, समीर चौघुले, रसिका वेंगुर्लेकर, रोहित माने, श्याम राजापूत, प्रसाद खांडेकर, प्राजक्ता माळीदेखील दिसत आहेत.

आणखी वाचा – ‘मिथुन’सह ‘या’ राशींसाठी मंगळवारचा दिवस आर्थिक फायद्याचा, प्रत्येक कामात मिळेल यश, जाणून घ्या…  

दरम्यान, सिंगापूरमध्ये हास्यजत्रेच्या टीमला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला होता. तुफान प्रेक्षकांच्या गर्दीत हास्यजत्रेचा सिंगापूर दौरा अगदी यशस्वी झाला ऐ त्याची झलक या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. या व्हिडीओला वनितासह हास्यजत्रेच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच या व्हिडीओखाली अनेकांनी त्यांचे कौतुकही केले आहे.

Tags: maharashtrachi hasyajatramarathi entertainment newsvanita kharat
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Aditi Dravid New Home

"घर घ्यायचं त्याच रात्री ठरवलं अन्…; नवीन घर घेतल्यानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, "चार वर्ष कष्ट…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.