बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

८०० व्हीआयपी पाहुणे, ४३८० किलोमीटर समुद्राचा प्रवास अन्…; अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये काय काय असणार?, Inside Details

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 27, 2024 | 8:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Anant Ambani Radhika Merchant Pre Wedding

८०० व्हीआयपी पाहुणे, ४३८० किलोमीटर समुद्राचा प्रवास अन्…; अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये काय काय असणार?, Inside Details

पुन्हा एकदा बॉलिवूडमधील कलाकारांना मुकेश अंबानींच्या पार्टीत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचे १२ जुलै रोजी लग्न होणार असून त्याआधी आणखी एका प्री-वेडिंग पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, यावेळी ही पार्टी समुद्राच्या मधोमध एका क्रूझवर आयोजित करण्यात आली असून, हा उत्सव तीन दिवस चालणार आहे. अनंत व राधिकाच्या जाम नगर, गुजरातमध्ये (रिलायन्स कंपनीचे ॲनिमल रेस्क्यू सेंटर ‘वंतारा’) येथे मार्चमध्ये झालेल्या लक्झरी प्री-वेडिंगची चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. दुसरा प्री-वेडिंग सोहळा २८ मे ते ३० मे दरम्यान होणार आहे, जो क्रूझवर होणार आहे. ही क्रूझ इटली व फ्रान्सदरम्यान सुमारे ४,३८० किलोमीटरपर्यंत अंतर जाईल. आणि या दरम्यान सिनेसृष्टीतील कलाकार व दिग्गज व्यक्तिमत्व विविध थीम असलेल्या फंक्शन्सचा भाग असतील. हे लग्न भारतातील अनोखे लग्नांपैकी एक असल्याचे म्हटलं जात आहे, ज्यावर संपूर्ण जगाच्या नजरा खिळल्या आहेत. (Anant Ambani Radhika Merchant Pre Wedding)

सलमान खान, रणबीर कपूर, आलिया भट्ट, रणवीर सिंग ही कलाकार मंडळी सोमवारी सकाळी क्रूझवर आयोजित प्री-वेडिंग पार्टीत सहभागी होण्यासाठी निघाले आहेत. या सर्वांशिवाय शेवटच्या प्री-वेडिंगसाठी जामनगरला पोहोचलेल्या सर्व कलाकारांचा समावेश करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, याआधी मियामीहून क्रूझ मिळण्याची चर्चा होती, परंतु फ्रान्समध्ये त्या क्रूझला पार्किंग करण्यात अडचण येईल या कारणास्तव, माल्टा येथून ‘सेलिब्रिटी असेंट’ नावाची ५ स्टार क्रूझ ऑर्डर केली गेली आहे जी केवळ ६ महिने जुनी आहे. या क्रूझला १ डिसेंबर २०२३ रोजी माल्टामध्ये लॉन्च करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे.

आणखी वाचा – “मन भरुन आलं आणि…”, ‘कान्स’मधून जगभरात पोहोचल्यानंतर छाया कदम यांची पहिली पोस्ट, म्हणाल्या, “एक एक क्षण जेव्हा…”

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अंबानी यांचे एकूण ८०० पाहुणे या क्रूझमध्ये सामील होणार आहेत. ज्यात चित्रपट कलाकार आणि इतर पाहुणेमंडळी असणार आहेत. ज्यांना जगभरातून आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, क्रूझची क्षमता ३२७९ असल्याचे सांगण्यात येत आहे. येथे ६०० कर्मचारी असतील जे या पाहुण्यांची काळजी घेतील. या प्री-वेडिंगला हजेरी लावणारे सिनेस्टार इटलीच्या पालेर्मो शहरातून त्यांचा क्रूझ प्रवास सुरु करणार असल्याचे बोलले जात आहे. हजारो किलोमीटरचा प्रवास करुन हे तारे सिव्हिटावेचिया बंदरात पोहोचतील. तथापि, यानंतर क्रूझचे पुढील गंतव्य जिनेव्हाजवळील पोर्टोफिनो शहर असणार आहे. अंबानी कुटुंबाने या शहरात आपल्या पाहुण्यांसाठी खास जेवणाची व्यवस्था केली असून त्यासाठी पोर्टोफिनोमधील अनेक व्हिला भाड्याने देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

आणखी वाचा – दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला मुन्नावर फारुकी?, १० ते १२ दिवसांपूर्वी गुपचुप उरकलं लग्न

कार्यक्रमासाठी पाहुण्यांसाठी ड्रेसिंग थीम सेट केली गेली आहे आणि क्रूझची सजावट स्पेस थीमवर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे एकूण तीन दिवस (२८-३० मे) चालणाऱ्या दुसऱ्या प्री-वेडिंग सोहळ्यानंतर १२ जुलै रोजी लग्नगाठ बांधतील. आधी असे बोलले जात होते की, दोघेही लंडनच्या स्टोक पार्कमधील एका आलिशान घरात लग्न करणार आहेत, पण आता बातमी अशी आहे की, दोघेही मुंबईतच लग्न करणार आहेत. क्रूझवर होणाऱ्या पार्टीत विविध प्रकारचे पदार्थ असतील असे बोलले जात आहे. यावेळी पारशी, थाई, मेक्सिकन आणि जपानी पाककृती ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे

Tags: Anant Ambani Radhika MerchantAnant Ambani Radhika Merchant Pre WeddingBollywood Celebrities at Anant Ambani Weddingbollywood celebrity
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Paaru Serial Update

दामिनी-दिशाचा डाव यशस्वी, किर्लोस्करांचं नाव वाचवायला आदित्य बोहोल्यावर, अहिल्यादेवींचा राग अनावर होणार का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.