‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक विनोदवीराने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. हास्यजत्रेमुळे अनेक नवोदित कलाकारांना संधी मिळाली. या कार्यक्रमातील अभिनेत्री शिवली परबने ‘कल्याणची चुलबुली’ अशी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. शिवाली तिच्या विनोदामुळे चर्चेत असते च पण ती तिच्या मनमोहक फोटोंमुळेदेखील चांगलीच चर्चेत राहते. सोशल मीडियावर अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
अभिनेत्री सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या विविध लूकमधील फोटो व व्हिडीओची चांगलीच चर्चा रंगते. सोशल मीडियावर आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच अभिनेत्री सध्या तिच्या गावाला गेली असून तिने गावचे काही खास क्षण सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत. शिवाली तिच्या गावी कोकणात गेली असून कोकणात तिने चुलीवर जेवण बनवलं आहे आणि जेवण बनवण्याची काही खास क्षणही तिने इन्स्टाग्रामद्वारे शेअर केले आहेत.
शिवालीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे ती चुलीवर जेवण बनवतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती मिरची तळताना दिसत आहे. शिवाली परब सध्या तिच्या व्यस्त वेळातून वेळ काढत आपल्या गावी पोहोचेली आहे आणि गावचे खास क्षण ती सोशल मीडियाद्वारे शेअर करत आहे. शिवाली परब ही सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोमधील अनेक पात्रांमधून ती प्रेक्षकांना हसवण्याचे काम करत आहे. या शिवाय ती काही म्युझिक अल्बममधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.
आणखी वाचा – “दौरा छान असला तरी…”, परदेशात निघालेला संकर्षण कऱ्हाडे भावुक, म्हणाला, “मुंबईची, घरची आणि…”
याचबरोबर ती काही दिवसांपूर्वी चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. दरम्यान, शिवाली परबने शेअर केलेल्या व्हिडीओमुळे अनेकजण तिच्या साधेपणाचं कौतुक करत आहेत. तसेच अनेकजण तिला चुलीवर जेवण करताना पाहूनही तिचे कौतुक करत आहेत.