रविवार, जून 14, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नेत्राच्या पोटात वाढतोय विरोचकाचाच अंश, त्रिनयना देवीच्या लेकी या नवीन संकटाचा सामना कसा करणार? कथेला ट्विस्ट

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 10, 2024 | 9:27 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Satvya Mulichi Satavi Mulgi serial update one baby in Netra's stomach and two heartbeats are heard.

नेत्राच्या पोटात वाढतोय विरोचकाचाच अंश, त्रिनयना देवीच्या लेकी या नवीन संकटाचा सामना कसा करणार? कथेला ट्विस्ट

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेच्या कालच्या भागात रुपालीने अद्वैतचे प्रतिबिंब तयार करुन ते नेत्राच्या खोलीत पाठवले होते. मग ते प्रतिबिंब नेत्राच्या पोटावर हात ठेवून मंत्र म्हणतं. मात्र तितक्यात नेत्रा सावध होते आणि तिला काहीतरी गडबड असल्याचा संशय येतो. यामुळे ती धावत रुपालीच्या खोलीत जाते आणि रुपाली वाजवत असलेल्या वीणाची तार तोडते. अशातच आजच्या भागात नेत्राने वीणाची तार तोडताच ती वीणा नष्ट होते. यानंतर रुपाली व नेत्रा एकमेकींकडे रागाने बघत एकमेकींचा गळा पकडतात.

मग अद्वैत, इंद्राणी व शेखर त्या दोघींना सोडवतात. त्यानंतर नेत्रा अद्वैत आपल्या खोलीत येताच अद्वैत नेत्राला त्याच्या प्रतिबिंबाने काही केले तर नाही ना असं विचारतो. तेव्हा नेत्रा प्रतिबिंबाने तिच्या पोटावर हात ठेवून कोणता तरी मंत्र म्हटल्याचे सांगते. मग अचानक तिच्या पोटात कळा सुरु होऊ लागतात. तेव्हा इंद्राणीदेखील तिथे येते आणि तिला नक्की काय झालं याबद्दल विचारते. इंद्राणीलादेखील नेत्रा तेच सांगते की अद्वैतच्या प्रतिबिंबाने तिच्या पोटावर हात ठेवुन कोणता तरी मंत्र म्हटला आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – तूळ, मकर व कुंभ राशीच्या लोकांसाठी बुधवारचा दिवस भाग्याचा, नोकरी-व्यवसायात निर्माण होणार नवीन संधी, जाणून घ्या…

पुढे रुपाली त्या प्रतिबिंबाने म्हटलेला तो मंत्र ऐकू आला मग पुढे काय झालं? असा विचार करत असताना तिला विरोचक दिसतो. जो  तिला “निश्चिंत राहा, तुझं काम झालं आहे. नेत्राच्या पोटातील बाळ हे विरोचकाचंच अंश आहे. तिच्या पोटात दैवी असं काही नाही. त्रिनयना देवीच्या लेकीच्या पोटात असताना आणि पोटातून बाहेर आल्यानंतरदेखील तो विरोचकाचाच अंश असणार आहे. तसेच तो विरोचकासाठीच काम करेल” असं म्हणतो. यानंतर दोघी मोठमोठ्याने हसू लागतात.

आणखी वाचा – कॉलेजमध्ये असताना मैत्री, प्रेम अन्…; निलेश साबळेच्या पत्नीने सांगितली रिअल लाइफ लव्हस्टोरी, म्हणाली, “त्याला मी आवडायचे आणि…”

पुढे नेत्रा-अद्वैत डॉक्टरांकडे जातात. तेव्हा ते नेत्राला तपासताना त्यांना काहीतरी वेगळंच असल्याचे दिसून येते. नेत्राच्या तपासणीदरम्यान त्यांना असं आढळून येतं की, नेत्राच्या पोटात बाळ एकच आहे मात्र हृदयाचे दोन ठोके ऐकू येत आहेत. यामुळे नेत्रा-अद्वैत दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसतो. त्यामुळे आता त्रिनयना देवीच्या लेकी या नवीन संकटाचा सामना कसा करणार? देवी त्यांना साथ कशी देणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.  

Tags: marathi entertainment newsMarathi Serial NewsSatvya mulichi satavi mulgi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
Marathi actor Sankarshan Karhade said that he will miss India, Mumbai, home and the audience a lot Before leaving for America by Instagram post

“दौरा छान असला तरी…”, परदेशात निघालेला संकर्षण कऱ्हाडे भावुक, म्हणाला, "मुंबईची, घरची आणि…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.