छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा.फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर परदेशातही हा शो आवडीने प्रेक्षक पाहतात. या कार्यक्रमातील कलाकारांवरही प्रेक्षक भरभरून प्रेम करतात.या शो मधील छोट्या पॅकेज बडा धमाका म्हणजे अभिनेत्री शिवाली परब हिची चर्चा रंगली.शिवाली ही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.ती तिच्या फोटो व्हिडीओने चाहत्यांना घायाळ करते. पण सध्या तिने एका ट्रॉलर्सला सडेतोड उत्तर दिल्याने ती चर्चेत आली.(Shivali Parab Troll)
शिवाली तिचे बोल्ड,ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करते.सध्या तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.सध्या तिने तिच्या इंस्टाग्रामवर वेस्टर्न आउटफिटमधील फोटो शेअर केले आहेत.या फोटोत तीने येलो रंगाचा वनपीस परिधान केलाय. यावर तिने नेकपीस ,लांब कानातले घातलेत आणि तिच्या हटके हेअरस्टाईलने चाहत्यांचं लक्ष वेधलं. यात तिचा हटके मेकअप सुद्धा दिसून येतोय.काहींना शिवालीचा हा लुक प्रचंड आवडला. पण काहींनी मात्र यावरून शिवालीला ट्रोल करायला सुरूवात केली. एका युजरने शिवालीच्या मेकअपवर टिप्पणी केली. तर युजरला शिवालीने सडेतोड उत्तर दिलं. मेकअप मॅनला अतिस्वातंत्र्य दिल्याचे परिणाम” असं या युजरने शिवालीच्या फोटोंवर कमेंट करत लिहिलं.

तर ही कमेंट पाहून शिवाली चिडली असून तिने युजरला “माझा मेकअप मीच करते. यामुळे काळजी नको” असं म्हटलंय. तर यावर चाहत्याने तिला रिप्लाय देत “नेहमीपेक्षा वेगळा लूक वाटला, म्हणून म्हटलं.राग मानू नये.बाकी आपल्या टॅलेंटचे आम्ही फॅन आहोत मेकअप कसाही का असेना” असं म्हटलंय. तर हा तिचा मोना डार्लिंग या भूमिकेचा लूक असून तिची ही भूमिका चाहत्यांची आवडती भूमिका आहे.(Shivali Parab Troll)
हे देखील वाचा – पिवळ्या ड्रेसमध्ये शिवालीचा “बोल्ड”अंदाज
हास्यजत्रेसोबत शिवाली पोस्ट ऑफिस उघडं आहे या मालिकेत रुपाली ही भूमिका साकारते.शिवाली अनेक नाटकांमध्ये आणि वेब सीरिजमध्ये दिसली आहे. सुरुवातीला शिवालीने ‘हृदयात वाजे समथींगल’ या मालिकेमध्ये काम केलं आणि त्या नंतर शिवाली ‘बँक बँचर’ या वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली.
