बुधवार, जून 3, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

समीर चौघुले सुरु करणार स्वत:चा कार्यक्रम, पोस्ट करत मोठी घोषणा, शोचं नाव आहे…

Saurabh Moreby Saurabh More
जून 1, 2024 | 11:16 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Maharashtrachi Hasyajatra fame Samir Choughule shared a post announcing his new show

समीर चौघुले सुरु करणार स्वत:चा कार्यक्रम, पोस्ट करत मोठी घोषणा, शोचं नाव आहे...

छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय शोमधून सर्वांना पोट धरून हसवणारे हरहुन्नरी अभिनेते म्हणून समीर चौघुले यांची लोकप्रियता आहे. त्यांच्या विनोदी अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात त्यांचं एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. या कार्यक्रमाला आतापर्यंत अनेक दिवस झाले असूनही या शोची व या शोमधील कलाकारांची लोकप्रियता व प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढत आहे. या शोची लहानापासून ते अगदी वयोवृद्धापर्यंत प्रत्येकाच्या मनात प्रचंड क्रेझ असल्याचे पाहायला मिळत आहे आणि ही क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधील त्यांच्या प्रत्येक स्किट्सची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. अशातच समीर चौघुले त्यांच्या चाहत्यांसाठी एक नवीन कार्यक्रम घेऊन येत आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून हसवणारे समीर चौघुले आता त्यांच्या आणखी एका कार्यक्रमातून प्रेक्षकांना हसवायला सज्ज झाले आहेत. समीर चौघुले त्यांचा एक नवाकोरा कार्यक्रम घेऊन येत असून या कार्यक्रमाद्वारे दीड तास धमाल किस्से, गप्पा मनोरंजन होणार आहे. यासंदर्भात समीर चौघुलेंनी नुकतीच इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Samir Choughule (@samirchoughule)

या पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, “‘सम्या सम्या मैफिलीत माझ्या’ समीर चौघुले. प्रेम हे ट्रेनमध्ये चढताना हुकलेल्या संधीसारखं असत, जे संधीच सोनं करतात त्याना संसाराची विंडोसीट मिळते. तर काही जणांच्या मते, प्रेम हे प्राजक्ताच्या सड्यासारखं असत जे नेहेमी पायदळी तुडवलं जातं. तर काही जणांच्या मते खरं प्रेम म्हणजे ‘एखाद जुनं पुस्तक चाळताना सापडलेलं मोराचं पीस” लग्न म्हणजे काय यावर कोणीतरी म्हटलं आहे “साबणाची संपत आलेली जुनी वडी नव्या कोऱ्या साबणाला चिकटवणे आणि साबण मोठा करून पुढील अंघोळ करणे”. काही जणांच्या मते लग्न म्हणजे “मुंडावळ्या बांधून वाजत गाजत संसाराच्या बाईकवर बसून ‘मौत का कुव्वा’ मध्ये उडी मारणे” वगैरे वगैरे.”

आणखी वाचा – दुसऱ्यांदा संसार थाटल्यानंतर वर्षभरातच नवऱ्यापासून वेगळी, गंभीर आरोपांनंतर पुन्हा नव्या नवरीसारखी नटली सुप्रसिद्ध अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल

यापुढे त्यांनी या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “आयुष्यात सुखी होण्यासाठी गुदगुल्या करणाऱ्या, मजेशीर, हास्यकल्लोळ उसळवणाऱ्या महत्वाच्या टिप्स घेऊन येतायत सदाबहार युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक आणि सुप्रसिद्ध अभिनेता लेखक समीर चौघुले. एक नवा कोराकरकरीत एकपात्री कथाकथनाचा कार्यक्रम घेऊन ‘सम्या सम्या मैफिलीत माझ्या’ हसतखेळत गुदगुल्या करत आपल्याला आपलाच आरसा दाखवणाऱ्या धम्माल विनोदांची भेळ म्हणजेचं ‘सम्या सम्या मैफिलीत माझ्या’ सम्याच्या मैफिलीत तुमचं स्वागत आहे”.

आणखी वाचा – “एखाद्या भूमिकेसाठी AI कशाला?”, मराठीमध्येही AI तंत्रज्ञान वापरण्यावरुन ‘नवरी मिळे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री भडकली, म्हणाली, “थोडे कष्ट…”

दरम्यान, समीर चौघुलेंच्या या पोस्टला त्यांच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेकांनी त्यांच्या या नवीन सुरुवातीसाठी त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. त्याचबरोबर प्रसाद ओक, स्पृहा जोशी, अभिजीत खांडकेकर, शिवाली परब, वनिता खरात, नम्रता संभेराव आदी कलाकारांनीही समीर चौघुले यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: maharashtrachi hasyajatraMarathi Comedy Showsamir choughuleSamya Samya Maifilit Majhya
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 Tea And Health
Entertainment

चहा पिण्याला कोणतं वय योग्य?, आजारी पडण्याआधी जाणून घ्या सविस्तर…

जून 3, 2026 | 12:10 pm
 aruna irani cancer
Entertainment

केमोथेरपीला नकार, केस गळतीची भीती आणि…; ७९ वर्षीय सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला दोनदा झाला कॅन्सर, स्वतःच्याच चुकीने…

जून 3, 2026 | 10:14 am
Amol Kolhe on Me Savitribai Jotirao Phule
Entertainment

सहा नव्या मालिका येताच ‘ही’ जुनी मालिका होणार बंद, ‘स्टार प्रवाह’चा मोठा निर्णय

जून 1, 2026 | 1:08 pm
Swanandi Tikekar new home photos
Entertainment

तीन वर्षाचं स्वप्न…; मराठी सेलिब्रिटी कपलने मुंबईत घेतलं नवं घर, बाल्कनीत पोज देत शेअर केली आनंदाची बातमी

जून 1, 2026 | 12:00 pm
Next Post
Paru fame Aditya actor Prasad Jawade and Amruta Deshmukh’s house

Video : 'पारू'मधील आदित्यच्या खऱ्या आयुष्यातील सासरवाडीतलं घर आहे अगदी मोठं व प्रशस्त, प्रत्येक वस्तू आहे अगदी खास, Video Inside

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.