बुधवार, जून 4, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“सावत्या म्हणतो…”, बायकोला उखाणा घ्यायला सांगताच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम रोहित मानेला फुटला घाम; व्हिडीओ चर्चेत

Majja Webdeskby Majja Webdesk
डिसेंबर 10, 2023 | 5:08 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Namrata Sambherao On Rohit Mane Wife

"सावत्या म्हणतो…", बायकोला उखाणा घ्यायला सांगताच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम रोहित मानेला फुटला घाम; व्हिडीओ चर्चेत

सध्या चित्रपटगृहांमध्ये ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट धुमाकूळ घालताना दिसत आहे. या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक करत प्रचंड कमाई करत सगळ्यांनाच चकीत केलं आहे. मात्र या सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की हिंदी चित्रपटांच्या गर्दीत मराठी चित्रपट आपलं स्थान टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरले आहेत. हेमंत ढोमेच्या ‘झिम्मा २’ नंतर आणखी एका चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे तो म्हणजे प्रसाद खांडेकरचा ‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट. दोन दिवसातच या चित्रपटाने लाखोंची कमाई करत सगळ्यांना चकीत केलं आहे. (Namrata Sambherao On Rohit Mane Wife)

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रसाद खांडेकर लिखित ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटात विशाखा सुभेदार, सयाजी शिंदेची, भाऊ कदम, तेजस्विनी पंडित, नम्रता संभेराव, वनिता खरात, प्रसाद खांडेकर, ओंकार भोजने, रोहित माने, गिरीश कुलकर्णी या कलाकारांची फौज आहे. ८ डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. चित्रपट प्रदर्शनाआधीपासुनचं चित्रपटातील कलाकार मंडळी चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ही कलाकार मंडळी चित्रपटगृहांमध्ये जात प्रेक्षकांना सरप्राईज भेट देतानाही दिसत आहेत. प्रेक्षकही कलाकारांचं, तसेच चित्रपटाचं भरभरून कौतुक करताना दिसत आहेत.

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रभाकर मोरे लेकीबरोबर पहिल्यांदाच शेअर करणार स्क्रीन, पोस्ट शेअर करत म्हणाले, “पहिलाच प्रोजेक्ट आणि…”

View this post on Instagram

A post shared by Namrata Yogesh Sambherao (@namrata_rudraaj)

अशातच नम्रता संभेराव हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत प्रसाद खांडेकर, रोहित माने, त्याची बायको, वनिता खरात, प्रेक्षक दिसत आहेत. रोहितच्या बायकोला यावेळी उखाणा घ्यायला सांगितलं जातो. हे पाहून रोहित मानेला घाम फुटतो. यावेळी रोहितची बायको श्रद्धा उखाणा घेत म्हणते की, “महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत सावत्या म्हणतो लगा लगा लगा…आमचा चित्रपट सगळ्यांनी एकदा येऊन तर बघा” सावत्याच्या बायकोने हटके उखाणा घेताच सगळेजण धुमाकूळ घालू लागतात.

आणखी वाचा – हॉस्पिटलमध्ये बर्थडे साजरा केला अन्….; मेघा घाडगेच्या वाढदिवसानिमित्तच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली, “मला…”

तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ठिकठिकाणी हा चित्रपट हाऊसफुल्लही झाला आहे.

Tags: marathi actormarathi serialmhjrohit manerohit mane wiferohit mane wife ukhana
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Priyanka Chopra talk about virginity
Entertainment

“व्हर्जिनिटी एका रात्रीत संपते पण…”, प्रियांका चोप्राने केलेलं धक्कादायक विधान, स्त्रियांच्या सेक्स लाइफबाबत म्हणालेली…

जून 3, 2025 | 6:45 pm
Vaishnavi Hagawane Death
Social

वैष्णवीच्या मृत्यूबाबत संशय, साडी व पंखा ७१ किलो वजन पेलू शकेल का?, फॉरेन्सिक रिपोर्ट ठरणार महत्त्वाचे

जून 3, 2025 | 6:00 pm
Zepto News
Social

अन्न तुंबलेल्या पाण्याजवळ ठेवले आणि…; झेप्टोचा किळसवाणा प्रकार समोर, तुम्हीही ऑर्डर करत असाल तर…

जून 3, 2025 | 4:23 pm
Actor Vibhu Raghav death
Entertainment

Video : कॅन्सरमुळे सुप्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, लेकाला शेवटचं पाहताना ढसाढसा रडली आई, भावुक व्हिडीओ समोर

जून 3, 2025 | 3:50 pm
Next Post
Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate Wedding

मोठ्या बहिणीच्या लग्नानंतर मुग्धा वैशंपायन लवकरच अडकणार विवाहबंधनात; 'ब्राईड टू बी' पार्टीच्या फोटोंनी वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.