‘बिग बॉस मराठी ४’ मध्ये झळकणारी लोकप्रिय अभिनेत्री मेघा घाडगे सोशल मीडियावर सक्रिय असते. ती कायमच आपले फोटो व व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते. मेघाने आपल्या अप्रतिम नृत्यकौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. तिचा अभिनय व नृत्य यामुळे ती कायमच चाहत्यांमध्ये चर्चेत असते. ‘बिग बॉस’ मराठीची स्पर्धक मेघा घाडगे सोशल मीडियावर चांगलीच अँक्टिव्ह असते. मेघाने ‘बिग बॉस’च्या घरात चांगला खेळ खेळला. मात्र कमी वोट्समुळे तिला बाहेर यावं लागलं. (Megha Ghadge Birthday Special)
अशातच लावणीची महाराणी असलेल्या मेघा घाडगेचा काळ वाढदिवस झाला. तिच्या वाढिदिवसानिमित्त मेघाला तिच्या अनेक चाहत्यांनी शुभेच्छा दिलेल्या पाहायला मिळाल्या. वाढदिवसानिमित्त मेघाने शेअर केलेल्या पोस्टने मात्र साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मेघाने शेअर केलेली ही पोस्ट तिने थेट हॉस्पिटलमधून केलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे तिच्या या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
मला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा, तुम्हा सर्वांना शुभेच्छांसाठी खुप खुप धन्यवाद” असं कॅप्शन देत थेट हॉस्पिटलमधील फोटो तिने शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये मेघा आजारी असून हॉस्पटिलमध्ये असल्याचं कळतंय. दरम्यान थेट हॉस्पिटलमध्ये केक घेऊन जात तिच्या कुटुंबीयांनी तिचा वाढदिवस साजरा केला आहे. मेघाने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिचे कुटुंबीय तिच्या आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
मेघाने शेअर केलेले कुटुंबाबरोबर वाढदिवस साजरा करतानाचे हे फोटो साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. तिच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिलेल्याही पाहायला मिळत आहेत. तिच्या चाहत्यांनी कमेंट करत, तिला वाढिदवसाच्या शुभेच्छा देत तिला लवकर बरं होण्यास तसेच काळजी घेण्यासही सांगितलेलं दिसतंय.