मंगळवार, मे 13, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या टीमसाठी कपडे डिझाइन करणारी ‘ती’ अशी झाली अभिनेत्री, म्हणाली, “विराज जगतापने मला…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
सप्टेंबर 6, 2023 | 8:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Maharashtrachi Hasyajatra fame Priyanka Hande

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या टीमसाठी कपडे डिझाइन करणारी 'ती' अशी झाली अभिनेत्री, म्हणाली, "विराज जगतापने मला…"

छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांचा लाडका कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. या कार्यक्रमाने गेली अनेक वर्ष प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. दमदार विनोदी स्किट्स व कलाकारांच्या आगळ्यावेगळ्या अभिनयाने हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या अगदी जवळचा बनला आहे. हास्यजत्रेतील बरेचसे कलाकार आपल्याला अनेकदा दिसत असतात. पण अशीच एक कलाकार आहे, जी क्वचित आपल्याला दिसत असते. पण त्या वेळात प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करते, ती म्हणजे अभिनेत्री प्रियांका हांडे. (Maharashtrachi Hasyajatra fame Priyanka Hande)

रंगभूमीच्या माध्यमातून अभिनयाला सुरुवात करणारी अभिनेत्री प्रियांका हांडे आज हास्यजत्रेतील महत्वाचा चेहरा बनली आहे. पण प्रियांकाचा हास्यजत्रेपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. सुरुवातीला कार्यक्रमाचं कॉस्च्यूम डिपार्टमेंट संभाळणारी प्रियांका हांडे असिस्टन्ट प्रोड्युसरसुद्धा आहे. मात्र, हास्यजत्रेच्या एका स्किटमध्ये प्रियांका सहभागी झाली, आणि रातोरात तिचे नशीब पालटले. प्रियांका हांडे गेल्या तीन वर्षांपासून हास्यजत्रेच्या कुटुंबाचा भाग आहे. जेव्हा ती या मंचावर येते, तेव्हा तिच्या चेहऱ्यावरील आनंद दिसून येतो.

पाहा प्रियांका हांडेंचा ‘हास्यजत्रे’मधील प्रवास (Maharashtrachi Hasyajatra fame Priyanka Hande)

याच प्रियांका हांडेने ‘इट्स मज्जा’शी संवाद साधताना तिने हास्यजत्रेतील प्रवासाबद्दल तिचा अनुभव शेअर केला आहे. प्रियांका हांडे या प्रवासावर बोलताना म्हणते, “मी सुरुवातीपासून अभिनय करत आले. मी कॉलेजमध्ये असल्यापासूनच एकांकिका वगैरे करत होते. पुढे मी प्रायोगिक, व्यावसायिक नाटकही केलं. पण माझं लग्न झालं, आणि त्यानंतर दोन वर्ष लॉकडाऊनमुळे काहीच करता येत नव्हतं. जेव्हा मला ‘हास्यजत्रेसाठी कलाकार हवी आहे’ असा विराज जगतापचा फोन आला. तेव्हा मी जराही विचार न करता त्याला हो म्हणाली. कारण यानिमित्ताने मला किमान घराबाहेर पडायला मिळत आहे.”

“पुढे हास्यजत्रेच्या मंचावर गेले आणि तिथे मी निर्माते सचिन गोस्वामी व सचिन मोटे सरांना भेटले. मला सरांनी विचारलं, की लग्नानंतर तुला काही अडचण येणार नाही ना ? तेव्हा मी सरांना असं काहीच होणार नसल्याचा विश्वास दिला. त्यानंतर मी या कार्यक्रमाचा भाग बनले. आज इथे येऊन बरीच वर्ष झाल्याचे मला कळलंच नाही. हास्यजत्रा माझ्यासाठी एक कुटुंबासारखं झालंय, की मला इकडे यायला खूप ओढ लागलेली असते. म्हणजे, जेव्हा मी इथून माझ्या सासरी जाताना जितकी आनंदी असते, तितकीच तिथून इथे येतानासुद्धा असते.” असे प्रियांका हांडे म्हणाली. (Maharashtrachi Hasyajatra fame Priyanka Hande)

Tags: maharashtrachi hasya jatrapriyanka handereality showsony marathi
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Ankita Walavalkar On Influencer
Entertainment

“फॉलोवर्सचा आकडा पाहून…”, सूरज चव्हाणचा ‘झापूक झुपुक’ न चालण्यावरुन कोकणहार्टेड गर्लचं भाष्य, म्हणाली, “त्याचे फॅन्स…”

मे 13, 2025 | 7:00 pm
abhijeet sawant on Marathi industry
Entertainment

“मराठी इंडस्ट्रीने कधी आपलसं केलंच नाही”, अभिजीत सावंतचा खुलासा, म्हणाला, “खूप दुखावलो…”

मे 13, 2025 | 6:22 pm
operation sindoor news
Entertainment

“गुटखा, जुगाराची जाहिरात करतात पण…”, कमांडो ऑफिसरचा बॉलिवूड सेलिब्रिटींना सवाल, ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा न देण्यावरुन…

मे 13, 2025 | 4:56 pm
Swiggy Delivery Boy Viral Video
Social

बाळंतपणात बायको गेली, संसार एकट्यावरच अन्…; लेकीला घेऊन स्विगी डिलिव्हरी करणारा ‘बाप’

मे 13, 2025 | 4:51 pm
Next Post
Girija Oak On Online Rummy

"ती तुमची चॉईस आहे…" ऑनलाईन खेळाच्या जाहिराती करण्यावर गिरीजा ओक स्पष्टच बोलली, म्हणाली, "मी जाहिरात…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.