भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी ‘बाल दिन २०२४’ साजरा केला जातो. आज देशभरात ‘बालदिन’ साजरा केला जाणार आहे. चाचा नेहरूंचा मुलांवर खूप जीव होता आणि त्यांना प्रेम आणि जिव्हाळा होता. मुलेही त्यांना प्रेमाने चाचा नेहरू म्हणत. यासाठी नेहरूजींच्या जयंतीनिमित्त ‘बालदिन’ साजरा केला जाऊ लागला. बालदिनानिमित्त अनेक् कलाकार मंडळी आपल्या मुलांबरोबरचे काही खास फोटो व व्हिडीओ शेअर करत आहेत. अशातच महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम विनोदी अभिनेता प्रसाद खांडेकरने आपल्या लेकाचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. (Prasad Khandekar Son)
बालदिनानिमित्त प्रसाद खांडेकराने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये त्याचा लेक काही कार्टूनची मिमिक्री करत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला तो लहान मुलांचे लोकप्रिय कार्टून ‘छोटा भीम’चे काही संवाद म्हनताना दिसत आहे. त्यानंतर तो काही इतर लोकप्रिय कार्टून्सची मिमिक्री करत असून त्याच्या या मिमिक्रीचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. प्रसादच्या पत्नीने लेकाचा व्हिडीओ हा खास व्हिडीओ शूट केला आहे, तर प्रसादने त्याच्या सोशल मीडियाद्वारे हा खास व्हिडीओ शेअर केला आहे. लेकाचा हा खास व्हिडीओ शेअर करत त्याने सर्व बच्चे कंपनीला बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
श्लोकचा हा खास व्हिडीओ शेअर करत प्रसादने असं म्हटलं आहे की, “बालदिनानिमित्त टॅलेंट च्या मुलामधील श्लोक मधील टॅलेंट चा व्हिडीओ शेअर अकरत आहे. बाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. स्वतःमधील बाळ जपुया… पोरखेळ, बालनाट्य, बचकांड हरकते, Childish (चाईल्डिश). अस काहीही बोलणाऱ्यांना बोलु द्या, त्यांच्यापेक्षा आपण लहान आहोत यातच खुष होऊया”. प्रसादच्या लेकाच्या या व्हिडीओला अनेकांनी लाईक्स व कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. कमेंट्सद्वारे त्याचे कौतुकही केलं आहे. “खूप छान”, “लय भारी” अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.
दरम्यान, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे प्रसाद खांडेकर. आजवर आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांना हसवणाऱ्या प्रसादने पहिल्यांदाच दिग्दर्शन क्षेत्रातही पदार्पण केलं. ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाचं त्याने दिग्दर्शन केलं असून याच चित्रपटाच्या माध्यमातून त्याच्या ७ वर्षाच्या मुलाने अभिनयक्षेत्रात पदार्पणही केलं आहे.