Paaru Marathi Serial Update : ‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, एकीकडे पारुने स्वतःच्या जीवावर जोखीम पत्करत अहिल्यादेवींचा जीव वाचवलेला असतो. अखेर महावीरचा खरा चेहरा तिने सगळ्यांसमोर आणलेला असतो आणि त्याला तुरुंगात पाठवलेलं असतं. त्यामुळेच अहिल्यादेवी श्रीकांत सगळेचजण थक्क होतात. पारूचा हा करारीपणा पाहून अहिल्यादेवी तिचं कौतुक करतात आणि तिला विचारतात, ‘या गोष्टीबद्दल तू आम्हाला या आधीच का नाही सांगितलं. जर तुझ्या जीवाचा काही बरं वाईट झालं असतं तर?’. तेव्हा पारू सांगते की, ‘मी तुम्हाला सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण माझ्यावर कोणीच विश्वास ठेवला नाही’.
यावर आदित्य पारूची माफी मागतो आणि सांगतो की, ‘माझ्याकडून तुझ्यावर यापुढे कधीच अविश्वास दाखवला जाणार नाही. तू वेळोवेळी मला सावध करत होतीस पण माझ्या डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली होती’. ते झाल्यानंतर पारू आपल्या घरी निघून जाते. तर इकडे मारुती पारुला जवळ घेत तिचं कौतुक करतो आणि तिला सांगतो, ‘तू इतकं धैर्य दाखवलंस तुला भीती वाटली नाही का?, तुझ्या पाठीमागे तुझा बा आणि तुझा भाऊ गणी आहे याची तुला भीती वाटली नाही का?’. यावर पारू उत्तर देत म्हणते की, ‘माझ्या पाठीमागे बा आणि गणी आहे पण अहिल्यादेवींच्या पाठी संपूर्ण किर्लोस्कर साम्राज्य आहे आणि त्यांचे हजारो कर्मचारी आहेत त्यामुळे मला त्यांचा जीव वाचवणं महत्त्वाचं वाटलं’. पारूच्या या उत्तराने आदित्य भुरळून जातो.
आदित्य त्याच वेळेला पारूची माफी मागण्यासाठी आलेला असतो. त्यानंतर आदित्य पारुला म्हणतो की, ‘तुला काही झालं असतं तर नक्कीच मला फरक पडला असता’. या वाक्यानं पारू सुद्धा हुरळून जाते. त्यानंतर पारू किचन मध्ये काम करत असते तेव्हा दामिनी येते आणि पारूला दमदाटी करत असते. त्याच वेळेला तिथे अहिल्यादेवी येतात, तेव्हा दामिनी पारूचं अचानक कौतुक करु लागते. तेव्हा अहिल्यादेवींच्या लक्षात येतं की, दामिनी नक्की इथं कशासाठी आली आहे. अहिल्यादेवी दामिनीला शिक्षा म्हणून तिथे जेवण करण्याचं काम लावतात आणि पारूला सुट्टी देतात. तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये दिशाला भेटायला कोणीतरी एक व्यक्ती येतं या व्यक्तीचा चेहरा अद्याप मालिकेत गुलदस्त्यात ठेवण्यात आलेला आहे आणि ती व्यक्ती दिशाला भेटते तेव्हा सांगते की, ‘काम सुरु झालं आहे’. त्यावर दिशा म्हणते, ‘अहिल्यादेवी आणि पारूचा नाश हा व्हायलाच पाहिजे, त्यांचा शेवट आता जवळ आलाय’.
आता दिशाला मदत करणारी ही मुलगी नेमकी कोण आहे?, हे मात्र अद्याप समोर आलेलं नाहीये. आता दिशाची ही वाईट नजर किर्लोस्कर कुटुंबावर पडणार का? पारू या सगळ्यातून किर्लोस्कर कुटुंबाला कसं सावध करेल, कसं सांभाळेल हे सारं पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.