महाराष्ट्रातील प्रेक्षकांना आपल्या विनोदाने खळखळून हसवणारा कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. गेल्या अनेक वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमातील कलाकारांवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात.कार्यक्रमातील कलाकारांची विनोदी शैली सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत असते. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यात हा कार्यक्रम अगदी यशस्वी ठरला आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतो. या कार्यक्रमातील कलाकाराने स्वतःची ओळख निर्माण करत खूप मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. यापैकीच एक म्हणजे हास्यवीर प्रभाकर मोरे. (Prabhakar more Shalu Video)
प्रभाकर मोरे यांनी त्यांच्या कोकणी बोलीभाषेने प्रेक्षकांना खळखळवून हसवलं. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील प्रभाकर मोरे यांचे आगळेवेगळे पात्र रसिक प्रेक्षकांच्या नेहमीच पसंतीस पडते. हास्यजत्रेतून ‘चिपळूणचा पारसमणी’ म्हणून ओळख मिळवणारे अभिनेते प्रभाकर मोरे त्यांच्या अभिनयाव्यतिरिक्त नृत्य शैलीमुळे चर्चेत असतात. प्रभाकर मोरे यांचा शालू डान्स जगभरात प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावरही प्रभाकर मोरे नेहमीच सक्रिय असतात.
सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाची संपूर्ण टीम दुबई येथील प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाचे जगभरात चाहते आहेत. बरेचदा हास्यजत्रेतील कलाकार मंडळी परदेशवारी करत प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. सध्या ही मंडळी दुबई येथे दौरा करण्यात व्यस्त आहेत. अशातच हास्यजत्रेतील सर्वांचे लाडके प्रभाकर मोरेही दुबई दौरा करत आहेत.
दुबई येथे फिरतानाचे अनेक फोटो व व्हिडीओ ते सोशल मीडियावरुन पोस्ट करत आहेत. अशातच प्रभाकर मोरे यांच्या एका व्हायरल व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. ‘बुर्ज अल’ दुबई समोर प्रभाकर मोरे यांचा धमाल ‘शालू’ डान्स करतानाचा हा व्हिडीओ आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ त्यांच्या चाहत्यावर्गाला आवडला असून नेटकरी या व्हिडीओला पसंती दर्शविताना दिसत आहेत.